Live Updates : अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएला मोठं यश, शेख शकीलला बेड्या

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 • News18 Lokmat
 • | August 12, 2022, 20:45 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:44 (IST)

  'संपूर्ण देशात 'घरोघरी तिरंगा' अभियान जल्लोषात'

  राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी लाट - मुख्यमंत्री

  22:18 (IST)

  'मुंबईपाठोपाठ पुण्यात होणार शिवसेना भवन'
  'श्रावणात होणार शिवसेना भवनची पूजा'
  'बालगंधर्व चौकात होणार शिवसेना भवन'
  शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी दिली माहिती

  21:3 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक

  21:2 (IST)

  प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर चाकूहल्ला
  भाषणादरम्यान अज्ञाताचा प्राणघातक हल्ला
  कार्यक्रमात सलमान रश्दींवर चाकूहल्ला
  न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार सुरू

  20:55 (IST)
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुंबई महानगर सज्ज, एकूण 41 लाख राष्ट्रध्वज तिरंगा घरोघरी वितरित, महापालिका मुख्यालयावर उद्यापासून 3 दिवस संध्याकाळी होणार प्रोजेक्शन मॅपिंग, मुंबईतील महत्त्वाच्या सर्व इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाई, मरीन ड्राईव्ह परिसरात 28 निवासी इमारती, 100 वृक्ष, 60 विद्युत खांब, विविध थोर पुरुषांचे 19 पुतळे याप्रमाणे तिरंगी आणि सुशोभित विद्युत रोषणाई
   
  20:41 (IST)

  अमरावतीत लहान मुलीवरील गोळीबार प्रकरण
  अमरावतीत गुन्हेगारांना भीतीच राहिली नाही - नवनीत राणा
  पोलीस आयुक्त आल्यापासून गुन्हेगारीत वाढ - नवनीत राणा

  20:38 (IST)

  अमरावती हत्याकांडात एनआयएला मोठं यश
  आरोपी शेख शकीलला एनआयएकडून अटक
  याप्रकरणी आतापर्यंत 10 आरोपी गजाआड

  19:53 (IST)

  मालेगाव - तलावात बुडून 3 मित्रांचा मृत्यू
  पोहण्यासाठी तिघेही तलावात उतरले होते
  तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश
  मालेगावच्या हिल स्टेशन भागातील घटना

  19:45 (IST)

  गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना आनंदाची बातमी
  गणेशोत्सव काळात आता विमान प्रवास सुलभ 

  मुंबई ते चिपी प्रवासात अजून एक विमानाची भर
  18 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार - नितेश राणे

  19:31 (IST)

  सोलापूर - एमआयएमचे 6 नगरसेवक राष्ट्रवादीत
  जयंत पाटलांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
  राष्ट्रवादी प्रवेशामुळे MIM ला सोलापुरात खिंडार

  Live Updates : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.