Live Update: वैभव नाईक ACB च्या रडारवर, शासकीय विश्रामगृहात अर्धा तास चौकशी

राज्यभरात आज पाऊस पडतो. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासून प्रचंड पाऊस पडतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन ते चार तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.

 • News18 Lokmat
 • | October 07, 2022, 21:39 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:34 (IST)

  कोविडच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना 31 मार्च 2023 पर्यंत अर्थसहाय्य देणार - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

  22:0 (IST)

  'संस्था उभी करणं, सातत्य टिकवणं अभिमानाची बाब'
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अरविंद प्रभूंचं कौतुक
  खेळाडू घडवण्याच्या या उद्देशाचं स्वागत - मुख्यमंत्री
  'रमेश प्रभूंची पुण्याई आहेच, त्यांनी लावलेलं रोपटं वाढवलं'
  'कोणतंही काम तळमळीनं केलं तरच त्याचं यश मिळतं'
  'संस्थेची वाटचाल अशीच पुढे सुरू राहील अशी आशा'
  'बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, महाराष्ट्र साथ देतोय'
  मुंबईतील सर्व अडकलेले प्रकल्प पुढे नेऊ - शिंदे
  कितीतरी लाखोंची गर्दी होती - एकनाथ शिंदे
  'लोक रिकाम्या मैदानाचे खोटे व्हिडीओ बनवतायत'
  आमच्या भूमिकेचं समर्थन सर्व करतायत - मुख्यमंत्री
  पंतप्रधान मोदींचाही या सरकारला पाठिंबा - शिंदे

  20:58 (IST)

  वैभव नाईकांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी
  शासकीय विश्रामगृहात एसीबीकडून अर्धा तास चौकशी
  मालमत्तेसंदर्भात चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती
  वैभव नाईक सेनेच्या विद्यमान ठाकरे गटाचे आमदार

  20:24 (IST)

  बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला

  20:21 (IST)

  सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही - अजित पवार
  'सरकारनं निधी वाटपातील असमानता थांबवावी'
  ...अन्यथा कोर्टाचे दरवाजे ठोठावू - अजित पवार
  विरोधी पक्षनेते अजित पवारांचं कोल्हापुरात वक्तव्य

  19:45 (IST)

  मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचं कॉंक्रीटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:41 (IST)

  पुणे - चांदणी चौकातली वाहतूक कोंडी अखेर फुटली, रस्ता रुंदीकरणाद्वारे आणखी दोन लेन वाढवल्या, साताऱ्याकडे जाण्यासाठी साडेचार तर मुंबईकडे जाण्यासाठी आता साडेतीन लेन उपलब्ध, पुणे कलेक्टर डॉ.राजेश देशमुखांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती

  19:35 (IST)

  - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सकाळी अकरा वाजेपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय
  - मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विकस्ळीत झाल्याची माहिती
  - पाऊस इतक्या लवकर थांबणार नसण्याची शक्यता
  - हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती
  - मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पुढचे तीन ते चार तास मध्यम ते जोरदार पावसाची खूप शक्यता
  - विशेष म्हणजे रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची शक्यता

  19:30 (IST)

  अजित पवरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा, त्यांच्या भाषणातील मुद्दे :

  सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही

  तुमच्या भाषणात निम्मी लोक निघून गेली

  लोकांना कशाला आलो हे माहीतच नव्हते

  10 कोटी एसटीला द्यायला कोठून आले पैसे

  जनतेला एसटी मिळाली नाही यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला का

  गद्दार गद्दार वाचून  भाषण चालले होते

  शिंदे साहेब असे नाही चालत

  तुम्ही महाराष्ट्रला कोठे घेऊन जाणार हे सांगायला हवं होतं

  प्रकल्प राज्यातून जात आहेत,दिल्लीला जाऊन हात हलवत आले

  महागाई बेरोजगारी यावर मेळाव्यात बोलायला हवं होतं

  19:22 (IST)

  'कोळीवाडा-गावठाणबाबत सीएमसोबत बैठक झाली'
  नवीन डीसीआर तयार करणार - राहुल शेवाळे
  '2022 पर्यंत सर्व घरं अधिकृत करण्याची मागणी मान्य'
  एसआरए नको ही मागणी मान्य केलीय - राहुल शेवाळे
  'वरळी सी-लिंक 120 मीटर अंतर मागणीबाबतही विचार'
  'पावसाळ्यात 3 महिने अनुदानासंदर्भातील मागणी मान्य'
  शिंदे समर्थक राहुल शेवाळेंची बैठकीनंतर माहिती

  Live Update: आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाच्या महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल.