LIVE: कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील पावसासह कोरोनाचे अपडेट्स आणि राज्य- देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

  • News18 Lokmat
  • | September 23, 2020, 22:13 IST |
    LAST UPDATED 3 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:57 (IST)

    'उद्धव ठाकरेंनी नाणार रद्द करून दाखवला'
    विनायक राऊत यांची निलेश राणेंवर टीका

    21:48 (IST)

    सातारा - कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला
    कोयना धरणात 105 टीएमसी पाणीसाठा
    आवक वाढल्यानं 6 वक्र दरवाजे 2 फुटांवर उचलले
    कोयना धरणातून 21 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग
    नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

    21:23 (IST)

    नागपूर जिल्ह्यात आज 1,291 कोरोना रुग्णांची नोंद
    नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 51 रुग्णांचा मृत्यू
    नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 67 हजार 671 वर

    21:20 (IST)

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं निधन
    दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
    सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे झालं निधन

    21:0 (IST)

    नवरात्र आणि दसरा गणेशोत्सवाप्रमाणे साधेपणानं साजरा करा, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं आवाहन, लवकरच याबाबत परिपत्रकही काढणार -उद्धव ठाकरे

    19:55 (IST)

    पुण्यात दिवसभरात 1789 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
    पुण्यात दिवसभरात 1512 रुग्णांना डिस्चार्ज
    पुण्यात दिवसभरात 61 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
    पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजार 307

    19:48 (IST)

    राज्यात आज कोरोनाचे 21 हजार 29 नवे रुग्ण
    राज्यात आज 479 कोरोना रुग्णांचा मृत्यू
    राज्यात आज 19 हजार 476 रुग्ण कोरोनामुक्त
    राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 75.65 टक्क्यांवर
    राज्यात सध्या 2 लाख 72 हजार अॅक्टिव्ह रुग्ण

    18:46 (IST)

    'राज्यात कोरोनासंदर्भात  2 लाख 67 हजार गुन्हे'
    26 कोटी 41 लाख रुपयांची दंड आकारणी -गृहमंत्री
    100 नंबरवर 1 लाख 13 हजार फोन -अनिल देशमुख

    17:30 (IST)

    बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मोठी बातमी
    4 मोठ्या अभिनेत्रींची होणार एनसीबीकडून चौकशी
    दीपिका पदुकोण, सारा अली खानला समन्स
    श्रद्धा कपूर, श्रुती मोदीलाही एनसीबीचे समन्स
    चौकशीसाठी 3 दिवसांत हजर राहण्याचे आदेश

    17:21 (IST)

    सप्टेंबरमध्ये जितका पाऊस होतो तितका एका दिवसांत झाला- आदित्य ठाकरे 
    सप्टेंबरमध्ये जितका पाऊस होतो तितका एका दिवसांत 80 टक्के पाऊस झाला. पंपिंग स्टेशनसोबत आता मुंबई फ्लड टॅन्क   उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी जमीन शोधत आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

    मुंबई, 23 सप्टेंबर : राज्यातील पावसासह कोरोनाचे अपडेट्स आणि राज्य- देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा....