Live Update :पुण्यात आज बऱ्याच वर्षांनी शरद पवारांनी तालुका निहाय बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पण याच बैठकीत कार्यकर्त्यांमधील गटबाजी तर उघड झालीच पण सोबतच वेल्ह्यातील एका कार्यकर्त्याने सुप्रियाताईंऐवजी चक्क अजितदादांनीच तालुक्यात लक्ष घालण्याची थेट मागणी केली. त्यामुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादीत खदखद असल्याचं उघड झालं.
वेल्हे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत गटबाजीची खदखद ही अशी जाहीरपणे बोलून दाखवली. वेल्हे तालुक्यात खासदार सुप्रियाताई या समजुतदारपणे कुणाला दुखावत नसल्यानेच गटबाजी फोफावली आहे. त्यामुळे तालुक्यातली गटबाजी संपवायची असेल तर अजितदादांनाच वेल्हे तालुक्यात लक्ष घालायला सांगा, अशी मागणी आपण पवार साहेबांकडे केल्याचं शंकर भरूक यांनी म्हटलं.