Live Update: येत्या सहा - सात महिन्यात महाराष्ट्रात मोठे उद्योग येणार - उदय सामंत

३१ ऑक्टोबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे.

 • News18 Lokmat
 • | October 28, 2022, 15:07 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:32 (IST)

  ठाणे - रामचंद्रनगर येथील सेनेच्या शाखेचं नाव बदललं
  शिवसेना शाखेचं नाव बदलून बाळासाहेबांची शाखा
  अनेक ठिकाणी आता शाखेच्या नावात आता बदल

  21:36 (IST)

  मुंबई - किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या
  एसआरए घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी
  किशोरी पेडणेकरांना उद्याही चौकशीला बोलावलं

  21:17 (IST)

  शिंदे सरकारचा 'मविआ'ला आणखी एक धक्का
  मविआतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढली
  ठाकरे कुटुंब, पवार कुटुंबाची सुरक्षा कायम
  मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ
  मिलिंद नार्वेकरांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
  मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांची माहिती

  19:25 (IST)

  'महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार'
  सूरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती

  17:12 (IST)

  बच्चू कडूंविरोधात रवी राणा समर्थकही आक्रमक
  बच्चू कडूंविरोधात आंदोलन करू नये - रवी राणा
  आमदार राणांकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

  17:4 (IST)

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक
  31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशी 15 दिवस बैठक
  राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं
  उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर होणार बैठक

  16:38 (IST)

  '8 सप्टें. 21 ला केंद्रानं कंपनीशी करार केला होता'
  मग हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा? - अजित पवार
  'दरवेळी प्रकल्प गेला की हे सांगतात जाऊ द्या'
  'आपण आणखी मोठा प्रकल्प आणू असं सांगतात'
  'आता म्हणतात प्रकल्प आलाच नव्हता, काय चाललंय?'
  शिंदे-फडणवीसांनी समोर येऊन बोलावं - अजित पवार
  राज्य सरकारची भूमिका मांडावी - अजित पवार
  या नाकर्तेपणाला कोण जबाबदार आहे? - अजित पवार
  लाडांच्या टक्केवारी आरोपाची चौकशी करा - अजितदादा

  16:22 (IST)

  NCP नेत्या सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
  'दुसऱ्या राज्यात 3 प्रकल्प जाण्याचं कारण काय?'
  राज्यातील जनतेला रोजगार नको का? - सुप्रिया सुळे
  'पक्षाच्या बांधणीसाठी शिर्डीत 4-5 तारखेला शिबीर'
  मराठी दिवाळी म्हणजे काय? - सुप्रिया सुळे
  बच्चू कडू हे संवेदनशील नेते - सुप्रिया सुळे
  'कडूंनी आपली भूमिका मांडल्याचा मला आनंद'

  16:12 (IST)

  'परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान'
  शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण - अजित पवार
  ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करा - अजित पवार
  शेतकरी संकटात सापडलाय - अजित पवार
  4, 5 तारखेला शिर्डीला राष्ट्रवादीचं शिबीर - पवार
  तालुका, जिल्हाध्यक्ष विशेष निमंत्रित - अजित पवार
  स्वत: पवारसाहेब शिबिराला संबोधणार - अजित पवार
  'प्रत्येक नेता स्वतंत्र विषयावर आपली मतं मांडेल'

  16:2 (IST)

  बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद शिगेला
  'माझ्यावर केलेले आरोप रवी राणांनी सिद्ध करावेत'
  रवी राणांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार - बच्चू कडू

  Live Update : 2 प्रकल्प राज्याबाहेर गेले ते आमच्या सरकारमध्ये गेले नाही. रायगडमधला प्रोजेक्ट बाहेर जाणार होता. इंसेंटिव्ह संदर्भात निर्णय योग्य पद्धतीने होत नव्हता. आम्ही निर्णय घेऊन चर्चा करून तो महाराष्ट्रात टिकवला. त्याचं काम सुरू आहे. येत्या सहा सात महिन्यात मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत, असं उदय सामंत म्हणाले.