Live Update: 'चुकीच्या वक्तव्याशी सहमत नाही'; राज्यपालांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे

 • News18 Lokmat
 • | November 25, 2022, 15:50 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 12 DAYS AGO

  हाइलाइट्स

  21:52 (IST)

  कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये जनसंवाद मेळावा
  'शिंदेंचा पुष्पहार, शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार'
  झोपडपट्टी भागातील लोकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप
  शेतकऱ्यांबद्दल आम्हाला वेगळी आपुलकी - शिंदे
  आम्हीदेखील शेतकऱ्यांची लेकरं आहोत - मुख्यमंत्री
  'शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे पाहवलं नाही
  बाळासाहेबांसोबत काम करण्याचं भाग्य लाभलं - शिंदे
  केरळसारख्या राज्यात धावून जाणारा एकमेव मी - शिंदे
  'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्यदैवत'
  'प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा होणार'
  स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान मोठं - मुख्यमंत्री शिंदे

  20:56 (IST)

  26/11 हल्ल्यासंबंधीचा धडा येणार - चंद्रकांत पाटील
  'शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करणार'
  बालगंधर्व चौकात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

  20:48 (IST)

  भाजपकडून हंसराज अहिरांवर मोठी जबाबदारी
  राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती
  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

  19:44 (IST)

  जत तालुका पाणी संघर्ष कृती समिती आक्रमक
  राज्य सरकारला आठवडाभराचा अल्टिमेटम
  'मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्र्यांसह उमदीमध्ये यावं'
  पाणीप्रश्नावर तोडगा काढावा - सुनील पोतदार
  ...अन्यथा कर्नाटकात जाण्याचा दिला इशारा

  19:2 (IST)

  पुणे मनपा कार्यालयापर्यंत पुणे मेट्रो ट्रायल यशस्वी
  यापूर्वी डेक्कन स्टेशनपर्यंत झाली होती मेट्रो चाचणी

  18:3 (IST)
  पुणे विमानतळ पार्किंग मॉलचं उद‌्घाटन, पुणे शहराला विश्वाचं नवरत्न बनवणार, 1 डिसेंबरपासून सिंगापूर फ्लाईटही सुरू करणार, पुण्यात सध्याच्या विमानतळावरच नवीन एअरपोर्ट टर्मिनल उभारणार, कार्गो टर्मिनलही उभारणार - ज्योतिरादित्य सिंधिया
  18:0 (IST)

  सांगलीतील उमदी गावकऱ्यांची बैठक सुरू
  जत तालुका पाणी कृती समितीची बैठक
  पाणी प्रश्नावरून कर्नाटकात जाण्याचा इशारा
  मोठ्या संख्येनं ग्रामस्थ बैठकीला उपस्थित

  17:55 (IST)

  पुणे विमानतळ पार्किंग मॉलचं उद‌्घाटन
  ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते शुभारंभ
  पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचीही उपस्थिती
  नवीन एअरपोर्ट जेव्हा होईल तेव्हा होईल - पाटील
  'आहे त्या एअरपोर्टवर सुविधा मिळवण्याचे प्रयत्न'
  'त्याचाच एक भाग म्हणून मल्टिलेव्हल पार्किंग मॉल'

  17:46 (IST)

  महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद
  '865 गावांमधील संस्था, संघटनांना बळ देणार'
  सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
  'मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून मदत करणार'

  17:25 (IST)
  'सिरम'ची एक कोटीची फसवणूक प्रकरण, वेगवेगळ्या राज्यांतील 7 ‍आरोपींना बेड्या, बंडगार्डन पोलिसांची कारवाई, मुख्य आरोपी अजूनही मोकाट
   

  Live Update : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होत नाही. कुणाच्याही चुकीच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असं त्यांनी म्हटलं