Live Update: ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक

आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानही अलर्ट मोडवर आहे. मंदीर प्रशासनाच्यावतीने भाविकांना मोफत मास्क वाटले जात आहेत.

  • News18 Lokmat
  • | December 23, 2022, 21:55 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 5 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    21:52 (IST)

    कोचर पती-पत्नीला दिल्लीतून अटक
    बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई

    21:51 (IST)

    80 कोटींहून अधिक गरीबांना मोठा दिलासा
    पुढील एक वर्ष मोफत रेशन मिळणार
    केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
    वन रँक वन पेन्शन निर्णयातही काही बदल
    1 जुलै 2014 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ

    20:54 (IST)

    छत्तीसगडच्या हद्दीत सी-60 जवानांची कारवाई
    सी-60 जवानांच्या कारवाईत 2 माओवादी ठार
    300 जवानांनी घनदाट जंगलात राबवलं अभियान
    मृत माओवादी अनितावर 30 लाखांचं होतं बक्षीस
    जवानांनी एका जखमी माओवाद्याला केली अटक
    दोन एसएलआर बंदुकीसह तीन बंदुका केल्या जप्त

    20:21 (IST)

    मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क, नियमित RT-PCR चाचणीवर भर देणार, लसीकरणाचा वेग वाढवणार, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं, इतरांपासून सोशल डिस्टन्सिंग राखणार, कोविड-19 रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रुग्णालये आणि बेड, ऑक्सिजन सुविधा यासारखी संसाधनं उपलब्ध
    केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळ प्राधिकरण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं आरटी-पीसीआर चाचणी नमुने घेण्यात येणार, सर्व पॉझिटिव्ह नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी NIV, पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील, कोविड वॉर्ड वॉररूम 24x7 कार्यरत, नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात

    मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध, कोविड-19 रुग्णांवर उपचार करणारी 2 रुग्णालये आहेत, सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा, चार सरकारी रुग्णालये, 27 खासगी रुग्णालय सज्ज

    19:2 (IST)

    पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर ब्लास्टिंग
    दुर्घटनेत आई-मुलाचा मृत्यू तर 7 जण जखमी
    वावरले गावाजवळील धक्कादायक घटना
    कर्जतमधील रुग्णालयात जखमींवर उपचार

    18:2 (IST)

    'अधिवेशन झाल्यावर लवकरच कर्नाटकला जाणार'
    'शिंदे-फडणवीसांशी चर्चा करून कर्नाटकला जाणार'
    बोम्मईंना कळवून आम्ही जाणार - शंभुराज देसाई

    17:17 (IST)

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरण्याचं समितीचं आवाहन

    17:8 (IST)

    गडचिरोली - मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांचं आंदोलन मागे
    शेतकऱ्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल
    सर्व मागण्या पूर्ण करण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन
    तब्बल 37 दिवसांनंतर आंदोलन घेतलं मागे

    17:8 (IST)

    गडचिरोली - मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांचं आंदोलन मागे
    शेतकऱ्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल
    सर्व मागण्या पूर्ण करण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन
    तब्बल 37 दिवसांनंतर आंदोलन घेतलं मागे

    17:4 (IST)

    पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंच्या बदलीचा निषेध
    अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
    अहमदनगरच्या राहुरी पोलीस ठाण्यासमोरील प्रकार
    आंदोलकांना पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला

    Live Update: आईसीआईसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फ्रॉड प्रकरणात सीबीआयने याबाबत माहिती दिली.