Live Update: वसंत मोरेंची मनसेतून हकालपट्टी होणार? त्या भेटीमुळे चर्चांना उधाण

वसंत मोरे यांची मनसेतून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 • News18 Lokmat
 • | December 09, 2022, 15:51 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:20 (IST)

  ब्राझीलचं फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात
  क्रोएशियाकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव
  पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाची ब्राझीलवर बाजी

  21:49 (IST)

  पंतप्रधानांकडून जी-20 परिषदेच्या तयारीचा आढावा
  मोदींनी विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
  'राज्यांचं ब्रँडिंग करताना कार्यक्रमात लोकसहभाग हवा'
  जी-20 परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज - मुख्यमंत्री शिंदे

  20:47 (IST)

  ठाकरे पक्षातील योगेश भोईर खंडणी गुन्ह्यात फरार
  माजी नगरसेवक, मागाठाणे विधानसभेचे उपविभागप्रमुख
  गुन्हा शाखेकडून सध्या भोईरचा शोध सुरू
  25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

  18:23 (IST)

  मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला - चंद्रकांत पाटील
  'अनुदानावर अवलंबून न राहता शाळा सुरू केल्या' 
  ते सरकारवर अवलंबून नाही राहिले - चंद्रकांत पाटील
  भीक म्हणजे देणगी, वर्गणी - चंद्रकांत पाटील
  विरोधकांच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
  'झाडाला आंबे लागले की लोक दगड मारतात'
  आता यावरून पुन्हा वाद होईल, मिश्किल टोला

  17:54 (IST)

  नाशिकच्या सिन्नर मोहरी घाटात भीषण अपघात
  अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, दोनजण गंभीर

  17:49 (IST)

  ईडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

  17:49 (IST)

  ईडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

  17:47 (IST)

  19 डिसेंबरला ठाकरे पक्षाचा चलो विशाळगड नारा
  सकाळी 9 वा. कोल्हापुरातून शिवसैनिक निघणार
  '8 दिवसांत विशाळगड अतिक्रमणमुक्त करा'
  '...अन्यथा विशाळगडला अतिक्रमणमुक्त करू'
  जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा इशारा

  16:34 (IST)

  महाराष्ट्र एकीकरण समितीचा होणार मेळावा
  मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

  16:27 (IST)

  सरकारवर अवलंबून का राहता? - चंद्रकांत पाटील
  'फुले, आंबेडकरांनी शाळांसाठी भीक मागितली'
  औरंगाबादेत चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

  Live Update: वसंत मोरे यांची मनसेतून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांतर्गत वादामुळे राज ठाकरे यांना भेटायला मुंबईला निघालेल्या वसंत मोरेंना भेट नाकारून पुण्यात अमित ठाकरे यांना भेटायला परत पाठवलं गेलं. या भेटीबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, की मला नेत्यांनी बोलवलं म्हणून मी आलो आहे.