Live Updates: भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे गोळीबारात तरुणाचा मृत्यू, कारण अस्पष्ट

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू होती. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं.

 • News18 Lokmat
 • | December 07, 2022, 21:51 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:4 (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक

  20:50 (IST)

  30 वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषद 2022, राज्यस्तरावरून 30 प्रकल्पांची निवड, ठाणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी

  20:1 (IST)

  अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना
  नांदगाव पेठ इथं एसटी बसला विचित्र अपघात
  उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना बचावली
  काही प्रवासी जखमी, अनेकांचे वाचले थोडक्यात जीव

  19:46 (IST)

  राज्यातील तरुणांसाठी नोकरीची नवी संधी
  पोलिसांपाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध
  3110 तलाठी, 511 मंडळ अधिकारीपदं भरणार
  डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार
  महसूल विभागानं काढला भरतीचा जीआर

  17:57 (IST)

  अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब
  देशमुखांच्या जामिनावर उद्या होणार पुन्हा सुनावणी

  17:35 (IST)

  अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
  'बेळगावमधील मराठी बांधवांवरील हल्ले थांबावेत'
  'बेळगावमधील नागरिकांना सुरक्षा देण्यावर चर्चा'
  'सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी बोलावं'
  कर्नाटक सरकारकडे कडक भूमिका मांडा - अजित पवार
  दोन्ही सरकारनं हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी
  'मराठी बांधवांवर अन्याय न होण्याची काळजी घ्यावी'
  'कोर्टात बाजू मांडण्यासाठी कायदेतज्ज्ञ नियुक्त करावे'

  17:29 (IST)

  13 डिसेंबरला पुणे बंदची हाक, महाविकास आघाडीसह पुरोगामी विचाराचे पक्ष आणि संघटनांचा बैठकीत निर्णय

  17:28 (IST)

  काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली, एसटी गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतलाय, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यांतील जनतेला त्रास होऊ नये अशी आमची चर्चा झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशीही याबाबत माझी चर्चा झाली, इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  16:52 (IST)

  महापरिनिर्वाण दिनादिवशी चैत्यभूमी परिसरात चोरी, 59 मोबाईल लंपास, शिवाजी पार्क पोलिसांनी 3 आरोपींना पकडलं

  16:51 (IST)

  महापरिनिर्वाण दिनादिवशी चैत्यभूमी परिसरात चोरी
  59 मोबाईल लंपास, पोलिसांनी 3 आरोपींना पकडलं
  तीन आरोपींकडून आतापर्यंत 14 मोबाईल जप्त

  Live Updates: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू होती. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. एमसीडीमधील 250 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप आणि आपमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत होती. अशात आता निकाल समोर आला आहे. आम आदमी पार्टीने बहुमत मिळवलं आहे. आपने 134 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत