PM MODI LIVE : एका लढाईने पाकिस्तानला अक्कल येणार नाही - मोदी

मोदींना रात्रभऱ मिळत होते सर्जिकल स्ट्राईकचे LIVE अपडेट्स. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच हा खुलासा केला आहे. आपले जवान सीमेपलीकडे असताना एक तास काहीच अपडेट्स मिळत नव्हते, तेव्हा चलबिचल वाढली होती, असंही त्यांनी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 06:23 PM IST

PM MODI LIVE : एका लढाईने पाकिस्तानला अक्कल येणार नाही - मोदी

नवी दिल्ली, 1 जानेवारी : सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती, असं पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"सर्जिकल स्ट्राईक करणं ही मोठी जोखीम होती. पण मला राजकीय जोखमीची चिंता नसते. जवानांच्या जीवाची मला जास्त काळजी होती", असं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदींना रात्रभऱ सर्जिकल स्ट्राईकचे LIVE अपडेट्स मिळत होते, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. आपले जवान सीमेपलीकडे असताना एक तास काहीच अपडेट्स मिळत नव्हते, तेव्हा चलबिचल वाढली होती. असंही त्यांनी सांगितलं.


Loading..."एका लढाईने पाकिस्तानला धडा मिळणार नाही. पाकिस्तानला सुधारण्यासाठी खूप वेळ लागेल", असंही मोदी म्हणाले. ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधानांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली.
जनता विरुद्ध महागठबंधन

2019 ची निवडणूक मोदी विरुद्ध कोण असेल असं विचारलं असता पंतप्रधान म्हणाले, "पुढची निवडणूक ही जनता विरूद्ध महागहठबंधन अशी असेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने केली आहे. 2019च्या निवडणुकीबद्दल काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.


गांधी कुटुंबीयांना टोला


गांधी कुटुंबीयांना वाचवण्यासाठी मुद्दाम माहिती लपवली जात आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत केला. "ज्यांच्या चार पिढ्यांनी देशावर राज्य केलं, ते आता जामिनावर बाहेर आहेत... तेही त्यांच्यावर गुन्हा आहे आर्थिक गैरव्यवहाराचा. ही मोठी गोष्ट आहे. या कुटुंबासाठी काही लोक माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत" , असं मोदी म्हणाले.


"काँग्रेस एक संस्कृती आहे. काँग्रेस एक राजकीय विचार आहे. इतके दिवस याच विचारांनी राज्य केलं. मी काँग्रेसमुक्त भारत म्हणतो, तेव्हा तो पक्ष किंवा इन्स्टिट्यूट राहू नये असं नाही. त्या विचारांविरोधातली, त्या पद्धतीच्या विरोधातली ही लढाई आहे," असंही पंतप्रधान म्हणाले.


नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरेंच्या चौकीदार चोर है ला उत्तर  देताना म्हटलं की,  'युतीतील पक्षांना वाटतं की भाजपवर दबाव टाकून ते स्वतःचा फायदा करून घेऊ शकता.'


उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबद्दल


रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. "उर्जित पटेल यांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता",असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली. ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधानांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.


या मुलाखतीत त्यांना उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "उर्जित पटेल यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. ते सहा महिन्यांपासून राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यांच्या हा निर्णय वैयक्तिक होता."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...