उस्मानाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: दोन भावांत लढत, ओमराजे 66773 मतांनी आघाडीवर

उस्मानाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: दोन भावांत लढत, ओमराजे 66773 मतांनी आघाडीवर

उस्मानाबाद मतदारसंघात पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचा पुतण्या ओमराजे निंबाळकर या दोन भावांमध्येच लढत आहे. live loksabha election 2019 Osmanabad Maharashtra

  • Share this:

उस्मानाबाद, 23 मे- उस्मानाबाद मतदारसंघात पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचा पुतण्या ओमराजे निंबाळकर या दोन भावांमध्येच लढत आहे. दोन्ही भावांत काट्याची लढत पाहायला मिळत आहे. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून तर ओमराजे निंबाळकर शिवसेनेकडून लढत आहेत. राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 11 फेरी अखेर 66773 मतांनी आघाडीवर आहेत. तर राणा पाटील यांना 20048 मते मिळाली आहेत.

रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं

मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. पण शिवसेनेचे हे खासदार वादात सापडले. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचं प्रकरण तसंच पोलिसांशी गैरव्यवहार अशा या ना त्या प्रकरणात ते वादात अडकले. त्यामुळे या वेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नाही.

काँग्रेसची मक्तेदारी

या लोकसभा मतदारसंघात 1952 पासून 1996 पर्यंत 44 वर्षं काँग्रेसचं राज्य होतं. 1996 मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकल्यानंतर काँग्रेसची मक्तेदारी मोडीत निघाली.

उस्मानाबाद मतदारसंघात उमरगा, औसा, तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा, बार्शी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये उमरगा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस - राष्ट्रवादीचा दबदबा आहे.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण

शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील आहेत. पदमसिंह पाटील यांना या प्रकरणात अटकही झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचा रवी गायकवाड यांनी अडीच लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र रवींद्र गायकवाड यांच्या बंडखोरीचा फटका ओमराजेंना बसू शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्याने राणाजगजितसिंह यांना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

First published: May 23, 2019, 12:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading