रावेर लोकसभा निवडणूक 2019 LIVE : रक्षा खडसे सुरुवातीपासून आघाडीवर

रावेर लोकसभा निवडणूक 2019 LIVE : रक्षा खडसे सुरुवातीपासून आघाडीवर

उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उल्हास पाटील निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून रक्षा खडसे या सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. LIVE Lok Sabha Election Result 2019 Raver Raksha Khadse vs Ullhas Patil

  • Share this:

रावेर, 23 मे - उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उल्हास पाटील निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून रक्षा खडसे या सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. रक्षा या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 318,068 पुढे आहेत. रावेरची ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली आणि माजी खासदार उल्हास पाटील यांना तिथून उमेदवारी देण्यात आली.

रावेरच्या जागेवर भाजपचं चांगलं वर्चस्व आहे. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची सून आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला

जळगावची जागा भाजपकडे खेचून आणणं गिरीश महाजनांसाठी तितकसं सोपं असणार नाही. कारण या मतदारसंघात भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला. तसंच अंतर्गत वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे जळगावमध्ये गिरीश महाजनांसमोर विजयासाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटील मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी दंड थोपटले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक होतेय. ही निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण? हेही ठरवणारी आहे, हे निश्चित. जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहिलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंच्या गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

2014 मध्ये रक्षा खडसेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंचा विजय झाला होता. रक्षा खडसेंना 6 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष जैन इथे 2 लाख 87 हजार 384 एवढीच मतं मिळवू शकले.

2009 च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ जावळेंचा विजय झाला होता. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय झाल्यामुळे भाजप याही वेळी यश मिळवणार का याची चर्चा आहे.

भाजप - शिवसेनेचं वर्चस्व

रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांवर भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. याचा फायदा याही निवडणुकीत रक्षा खडसेंना मिळू शकेल.

तरुण खासदार होण्याचा मान

रक्षा खडसे यांनी 2010 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्या रावेरमधून खासदार म्हणून निवडून आल्या तेव्हा त्या फक्त 26 वर्षांच्या होत्या. त्यामुळे हीना गावित यांच्याप्रमाणेच लोकसभेच्या तरुण खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. आता पुन्हा एकदा रक्षा खडसे विजय मिळवून हॅटट्रिक करतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

VIDEO : आता 'लावा ना व्हिडिओ', मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

First published: May 23, 2019, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading