कल्याणचा गड शिवसेनेनं राखला; श्रीकांत शिंदेंचा दणदणीत विजय

कल्याणचा गड शिवसेनेनं राखला; श्रीकांत शिंदेंचा दणदणीत विजय

कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 मे : लक्षवेधी लढतीतील कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचा पराभव केला आहे. कल्याणच्या जागेवर अनेक वर्षं भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण, श्रीकांत शिंदे यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे.

2014मध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांना यावेळी 4 लाख 40 हजार 892 मतं मिळाली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना 1 लाख 90 हजार 143 मतं मिळाली होते. तर, तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे प्रमोद पाटील होते. त्यांना 1 लाख 22 हजार 349 मतं मिळाली होतीा. कल्याण लोकसभेची जागा अनेक वर्षं भाजप - शिवसेनेकडे आहे. हा मतदारसंघ जेव्हा ठाण्याचाच भाग होता त्यावेळी इथे प्रकाश परांजपे खासदार होते.

2009 मध्ये आनंद परांजपे विजयी

2009 मध्ये आनंद परांजपे शिवसेनेकडून लढून विजयी झाले. या निवडणुकीनंतर मात्र ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. 2014 च्या निवडणुकीत आनंद परांजपेंचा पराभव झाला आणि शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आले.

वेगवेगळ्या समुदायांचे मतदार

कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ विधानसभेत शिवसेना तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. कल्याण पूर्वमध्ये अपक्ष आमदार आहेत तर डोंबिवलीमध्ये भाजप, कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना तर मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

कल्याणच्या या मतदारसंघात उत्तर भारतीय, सिंधी यासोबतच मुस्लीम मतदारांचाही समावेश आहे.

VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

First published: May 23, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading