S M L

काँग्रेस फुटीचं राजकारण करतं, विजयी सभेत मोदींचा हल्लाबोल

104 जागा जिंकत भाजप कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरलाय. नवी दिल्लीतल्या भाजप पक्ष कार्यालयात विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: May 15, 2018 08:53 PM IST

काँग्रेस फुटीचं राजकारण करतं, विजयी सभेत मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली, 15 मे : 104 जागा जिंकत भाजप कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरलाय. नवी दिल्लीतल्या भाजप पक्ष कार्यालयात विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस फुटीचं राजकारण करतं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केलाय. तर सत्तास्थापनेसाठी काँग्रेस अनैतिक खेळी खेळत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलीय.

भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घामाच्या सुगंधामुळं कर्नाटकामध्ये कमळ फुलले आहे. कर्नाटकमधील पक्षासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या सर्वांचे हे यश आहे, असं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. मोदी यांनी कर्नाटकाच्या जनतेचे आभार मानले. विजय पराभव होत असतात, तत्त्व जपणं महत्त्वाचे  असे म्हणत यावेळी त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीकाही केली.

भाजपच्या दिल्ली मुख्यालयात कर्नाटकातल्या निवडणूक विजयानंतर विजय सभा आयोजित केली होती. त्यावेळी  विकासयात्रेमुळेच 15 व्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले आहे. हा विकास पुढे असाच चालत राहील. कर्नाटकमधील निकालावरून जनतेचा मोदींवरील विश्वास पुन्हा सिद्ध झाला आहे. या विश्वासावरच 2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करू असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2018 08:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close