मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजपथ झाला 'योगपथ' !

राजपथ झाला 'योगपथ' !

21 जून : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने लष्कराचे संचलन होणार्‍या दिल्लीतील राजपथावर आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून जाहीर केल्यानंतरचा हा पहिलाच योग दिन आहे. या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 39 हजार जणांनी राजपथवर योग केलं. विजय चौकापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या दीड किलोमीटरचा राजपथचा परिसर हा 'योगपथ' बनलेला आहे.

विजय चौकापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या दीड किलोमीटरचा राजपथचा परिसर हा 'योग परिसर' बनला होता. राजपथावर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कार्यक्रम होत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातच पंतप्रधान मोदींसह मंत्रिमंडळातले इतर मंत्रीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे केवळ निमंत्रितांनाच या कार्यक्रमात प्रवेश देण्यात आलेला होता. योगा शिक्षकांपासून फिजीकल ट्रेनिंगच्या शिक्षांपर्यंत सगळ्यांचा यात सहभाग होता. राजपथासह 17 अन्य छोट्या आणि महत्त्वाच्या मार्गावर मिळून 39 हजार नागरिकांना योग करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी 'मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर योग' या संस्थेने योगची सीडी तयार केली होती. ही सीडी मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवली जाईल. त्यानुसार उपस्थित नागरिकांनी योग केलं.

विशेष म्हणजे केंद्रीय दलांचे 5,000 जवान राजपथवर नागरिकांसोबत योगासने करणार आहेत. यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफचे प्रत्येकी 1200 जवान, तर भारत-तिबेट सीमा दल आणि सशस्त्र सीमा दलाचे प्रत्येकी 700 जवान योगासनं केली.

तर, अमित शाह पाटण्यामध्ये, सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयात, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौमध्ये, रविशंकर प्रसाद कोलकातामध्ये आणि व्यकंय्या नायडू चेन्नईमध्ये योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.

गिनीज बुकात नोंद ?

दिल्लीत राजपथावर झालेल्या सामुहिक योग कार्यक्रमाची गिनीज बुकात नोंद होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आयुष मंत्रालय यासाठी पाठपुरावा करते आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. राजपथावर 37 हजार लोकांनी सहभाग घेतला. याआधीच्या विक्रमाची नोंद ग्वाल्हेरची असून, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या सामुहिक योगासन कार्यक्रमात 29 हजार लोकांनी भाग घेतला होता

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: School, Yoga day, भारत, शाळा