Home /News /news /

स्वप्नपूर्ती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले !

स्वप्नपूर्ती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले !

pmnarendra_modi26 मे : मावळत्या सुर्याला साक्षीला ठेवत देशाचे नवे पंतप्रधान म्हणून मोदी युगाचा सुर्योदय झालाय. 'मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी...ईश्वर को साक्षी रखकर शपथ लेता हुँ..' असं म्हणत भाजपच्या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींनी हिंदीतून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ठीक संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात दिमखादार सोहळा सुरू झाला.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये 'स्कॉर्पिओ' गाडीने दाखल झाले. मोदी दाखल झाल्यावर 'मोदी मोदी'च्या जयघोषाने राष्ट्रपती भवन दणाणून गेलं. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन झाले आणि सर्वात पहिले नियमांप्रमाणे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. मोदी यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू,नितीन गडकरी, उमा भारती, डॉ. नजमा हेपतुल्ला, गोपीनाथ मुंडे, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे अनंत गीते आणि इतर मंत्र्यांनी शपथ घेतली.  उद्या सकाळी आठ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे सूत्र हाती घेणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेटही घेणार आहे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रागणात दिमाखदार असा हा सोहळा 'याची देही याचा डोळा' देशा-विदेशातील मान्यवरांनी अनुभवला. या शपथविधीला देशा-विदेशातील प्रमुख हजर होते. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी आज सार्क नेत्यांनी उपस्थिती लावली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, मालदिवचे पंतप्रधान अब्दुल्ला यामीन हेसुद्धा उपस्थित होते. देशाच्या इतिहासातला हा खरोखरच एक महत्त्वाचा क्षण होता. सार्क नेत्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोदींच्या कुटुंबीयांनी घरीच पाहिला शपथविधी सोहळा एका सर्वसामान्य घरातून आलेले नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते त्यावेळी राष्ट्रपतीभवनात मोदी यांच्या घरचा माणूस कुणीही हजर नव्हता. आपल्या जन्मभूमी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या कुटुंबीयांनी घरीच टीव्हीवर शपथविधी सोहळा पाहिला. मोदींच्या गांधीनगर इथल्या घरी मोदींच्या आई, भाऊ आणि इतर सदस्यांनी टीव्हीवर शपथविधी सोहळ्याचा आनंद लुटला. हा शपथविधी सुरू असताना मोदींच्या आईंना अश्रू अनावर झाले.

सेलिब्रिटी उपस्थित

तसंच देशातील राजकीय, उद्योग, सिनेसृष्टीतील दिग्गज उपस्थित होते. एनडीएचे सर्व नेते यावेळी हजर होते. तर रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, नीता अंबानी या सोहळ्यासाठी हजर होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे अन्य नेते हजर होते. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आपल्या पत्नी रश्मी ठाकरे मुलगा आदित्य आणि तेजससह उपस्थित होते. सिनेसृष्टीतून अभिनेते धर्मेंद्र, हेमामालिनी, अनुपम खैर, सलमान खान, सोहेल खान, हृतिक रोशन, त्यांचे वडील राकेश रोशन, विवेक ओबरॉय, बप्पी लहरी शपथविधीला हजर होते. विशेष म्हणजे मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची वेबसाईटही लाँच करण्यात आली. तसंच मोदींचं ट्विटर अकाऊंटवरही पीएम नरेंद्र मोदी असा उल्लेख करण्यात आलाय. मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी लाडू, जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

लतादीदी प्रकृती ठीक नसल्यामुळे गैरहजर पुण्यात दीनानाथ हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदी हजर होते. यावेळी लतादीदींनी मोदी हे आपल्या भावासारखे आहे आणि ते पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण आज नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली पण यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे लतातदीदी शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. लतादीदींनी मोदींना पत्र लिहून आपण हजर राहू शकलो नाही याबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसंच लतादीदींनी मोदींना शुभकार्यासाठी गणेशमूर्ती भेट म्हणून दिली. तर दुसरीकडे बॉलिवूडचा शहेनशाह अमितभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांतही शपथविधीला गैरहजर राहिले. बिग बी आणि रजनीकांत यांना आमंत्रण देण्यातही आले होते. यांनी घेतली शपथ नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ अरुण जेटली यांनी घेतली शपथ सुषमा स्वराज यांनी घेतली शपथ राजनाथ सिंग यांनी घेतली शपथ व्यंकय्या नायडू यांनी घेतली शपथ नितीन गडकरी यांनी घेतली शपथ उमा भारती यांनी घेतली शपथ डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी घेतली शपथ हरसिमरत कौर (शिरोमणी अकाली दल) यांनी घेतली शपथ अनंत गीते यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी घेतली शपथ प्रकाश जावडेकर यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ - (स्वतंत्र प्रभार) रावसाहेब दानवे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: #modioathLIVE, Advani, BJP, Gadkari, Gujrat, Lalkrishna, Modi, Narendra Damodardas Modi, Narendra Modi sworn-in as Prime Minister of India, PM narendra modi, Prime Minister of India, Rajnath singh, Sushma swaraj, Team modi, अनंत गीते, गोपीनाथ मुंडे, जेटली, टीम मोदी, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, मुरली मनोहर जोशी, राजनाथ, राजनाथ सिंह, रावसाहेब दानवे

पुढील बातम्या