मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चलो, राष्ट्रपती भवन !, भूसंपादनाविरोधात विरोधकांची पदयात्रा

चलो, राष्ट्रपती भवन !, भूसंपादनाविरोधात विरोधकांची पदयात्रा

congress march17 मार्च : मोदी सरकारने भूसंपादन विधेयकाची लढाई लोकसभेत जिंकली खर पण आताही लढाई रस्त्यावर उतरलीये. भूसंपादनाच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद ते राष्ट्रपती भवन अशी पदयात्रा काढण्यात आलीये. या पदयात्रेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर किमान दहा पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

भूसंपादन कायद्याच्या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आज राष्ट्रपती भवनाला धडक दिली. संसद ते राष्ट्रपती भवन अशी पदयात्रा त्यांनी काढली. 14 राजकीय पक्षांचा मोर्चात समावेश होता. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद यादव यासह अनेक दिग्गज नेते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यातले 26 खासदार राष्ट्रपती भवनात गेले. आणि त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन दिलं. भूसंपादन विधेयक मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. या पदयात्रेत जेडीएसचे एचडी देवेगौडा, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी राजा, यांच्याबरोबर तृणमूल, सप, द्रमुक, भारतीय लोकदल आणि आरजेडीचे नेतेही या पदयात्रेत सहभागी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: काँग्रेस, भूसंपादन विधेयक, मनमोहन सिंग, संसद, सोनिया गांधी