मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी !

निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी !

ganpati visarjan_2015_p27 सप्टेंबर : 'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' गेली दहा दिवस लाडक्या गणरायाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर आज जडअंतकराने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 'दु:खहर्ता, सुखकर्ता...' या आराध्य देवाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 'पुढच्या वर्षी लवकर या' हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आला. तर कुठे ढोल ताशांना निनाद, तर कुठे डीजेचा दणदणाट...तर कुठे मुक्त गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या राजाला वाजत गाजत निरोप देण्यात आला.

बघता बघता 10 दिवस कसे निघून गेले याची खबर कुणाला लागली नाही...गेली दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावाने सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष करत गणराय निरोप देण्यात आला.राज्यभरात गणेश विसर्जनाला आज सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मुंबईत मोठे गणपती आणि पुण्यात पाचही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात निघाली. संध्याकाळी पाचपर्यंत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं चार वाजून 10 मिनिटांनी पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन झालं. त्यानंतर मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन झालं. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाचही मानाच्या गणपतींना पुणेकरांनी निरोप दिलाय. विशेष म्हणजे यंदा, सर्व मानाच्या गणपतींचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणार आहे.तर मुंबईत तेजूकाया, धोबी तलाव, सुतारगल्ली, चंदनवाडी मंडळाच्या गणपतींचंं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलंय.

मुंबईत दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे अजूनही लालबागचा राजा आणि इतर मोठ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक रात्रभर सुरू राहणार आहे. आणि पहाटे या राजांना निरोप दिला जाणार आहे. मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर,सातारा, सांगलीमध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट ओढावल्यामुळे बाप्पा दुष्काळ घेऊन जा असं साकडं आपल्या लाडक्या गणरायाला मराठवाड्यातील जनतेनं घातलं. दरवर्षी बाप्पा येतो...पण, ही दहा दिवस असतात त्याची...त्याच्या सेवेची...त्याच्या आरास आणि लाडाची...पण या दहा दिवसांच्या मोबद्दल्यात...आपल्या भक्ताच्या वाटेतील विघ्न दूर करण्याची जबाबदारी तो आपल्यासोबत घेऊन जातो..त्यामुळे देवा आता आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, तर माफी असावी....

GANPATI @ BANNER

नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी विसर्जन

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनी यंदा देखील ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाचे आयोजन केलं होतं. आज सर्व बाप्पाच्या विसर्जनापूर्वी पोलिसांनी आपल्या बाप्पाचं ठाण्यातील तलाव पाळी मधील कृत्रिम तलावात विसर्जन केलं. बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर बाप्पाचं विसर्जन अत्यंत साध्यापद्धतीने केलं. पोलीस बांधवांनी बाप्पाला निरोप देत असताना पारंपारिक पद्धतीने आरती देखील केली. दरवर्षीप्रमाणे कायदा व्यवस्था लक्षात घेवून संध्याकाळी होणारी गर्दी लक्षात घेता त्या आधीच पोलिसांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं.

भुसावळमध्ये विसर्जन

भुसावळमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झालीये. भवानी पेठ मंडळाच्या गणपतीचं उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते पूजन करुन मिरवणुकीला सुरुवात झालीये. विशेष म्हणजे भवानी पेठ मंडळानं लहान मूर्तीची स्थापना केलीये. आणि मंडळाकडे जमा झालेली रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. तसंच भुसावळ नगरपालिकेच्या वतीने तापी नदी पात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षा रक्षक तैनात केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. लोकं गणपती सोबतच निर्माल्य सुद्धा नदीमध्ये विसर्जन करतात आणि त्यामुळे जल प्रदूषण होतं. या करीता अभियांत्रिकी महाविद्यालयचे विद्यार्थी निर्माल्य नदीमध्ये न टाकण्याचं आवाहन करत निर्माल्य गोळा करत आहे.

आर.के. स्टुडिओमध्ये बाप्पांना निरोप

मुंबईतल्या चेंबुर इथं आर. के. स्टुडिओमधल्या गणपतीची ही मिरवणूक आहे. ज्येष्ठ अभिनेते रणधिर कपूर आणि ऋषी कपूरही या मिरवणुकीत सहभागी झाले आहे. या अभिनेत्यांना पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली. राज कपूर यांच्या काळापासून आर. के. स्टुडिओत गणपतीची स्थापना केली जाते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

[if1] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Aurangabad, Bappa morya re, Nagpur, Nashik, Pune, Thane, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई, मुंबई विमानतळ