मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बजेटमधील घोषणा, वाचा एकाच पेजवर

बजेटमधील घोषणा, वाचा एकाच पेजवर

arun_jetlay3 यंदा अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मोदी सरकारने निवडून येताना दिलेलं 'अच्छे दिन' चं वचन यापुढे पूर्ण होणार का याक़डे सगळ्यांचं लक्ष आहे. दुष्काळ आणि अवकाळी पावसाने त्रासलेला शेतकरी सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतोय. तर सरकारने उत्पन्नावरची आयकर मर्यादा वाढवावी असा शहरी चाकरमानी मनातल्या मनात प्रार्थना करतोय. यंदा सातवा वेतन आयोग आणि 'वन रँक वन पेन्शन' मुळे येणारा प्रचंड आर्थिक भार सोसताना वित्तीय तूट कमी राखण्याचंही आव्हान सरकारसमोर आहे. सेवा करात 14 टक्क्यांवरून 16 टक्के करण्याची शक्यताही आहे. एकूणच काय, आज संपूर्ण देशाचं लक्ष बजेटकडे असणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: BJP, Union budget, अरुण जेटली

पुढील बातम्या