Home /News /news /

जादूच ! वयाच्या 21 व्या वर्षी व्यवसाय सुरु केला, सहा वर्षात थेट अब्जाधीश

जादूच ! वयाच्या 21 व्या वर्षी व्यवसाय सुरु केला, सहा वर्षात थेट अब्जाधीश

ब्रिटनमधल्या (Britain) एका यशस्वी महिलेची यशोगाथा वाचायलाच हवी. तिने 21 वर्षांची असताना एक व्यवसाय (How To Start Buisness) सुरु केला आणि त्यात तिला अमाप यश मिळालं. आता सहा वर्षांनंतर ती अब्जाधीश (Millionaire) झाली आहे.

  आपल्याकडे खूप पैसे असावेत, आपण श्रीमंत व्हावं (How To Become Rich) असं जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं; पण त्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत मोजकेच लोकं घेतात. जे त्यांच्या ध्येयाकडे अविश्रांत चालत राहतात त्यांना यश मिळतं. अशा काही यशोगाथा (Success Story) आपल्याला माहिती असतील; पण ब्रिटनमधल्या (Britain) एका यशस्वी महिलेची यशोगाथा वाचायलाच हवी. तिने 21 वर्षांची असताना एक व्यवसाय (How To Start Buisness) सुरु केला आणि त्यात तिला अमाप यश मिळालं. आता सहा वर्षांनंतर ती अब्जाधीश (Millionaire) झाली आहे.

  अवघ्या सहा वर्षांमध्ये तरुणी अब्जाधीश

  या महिलेचं नाव लिंडा (Linda) असं आहे. लिंडा ब्रिटनची आहे. तिनं टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया साईटवर आपली यशोगाथा (Success Story) सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे. लोकांना गुंतवणुकीच्या केवळ काही टिप्स देऊन (Investment Tips) लिंडानं यश मिळवलं आहे. ‘द मिरर’नं दिलेल्या माहितीनुसार, लिंडा टिकटॉकवर लिंडाफायनान्स (Linda finance) या नावानं ओळखली जाते. टिकटॉकवर ती व्हिडिओ बनवून गुंतवणुकीच्या काही टिप्स देते आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देते. तिच्या टिप्समुळे अनेकांना फायदा झाला आहे. 'वयाच्या 21 व्या वर्षी अगदी छोट्या स्तरावर तुम्ही एखादा व्यवसाय (Small Buisness) सुरू करता आणि सहा वर्षांनंतर म्हणजे 27 व्या वर्षी तुम्ही अब्जाधीश आहात, हे तुम्हाला समजतं तेव्हा प्रचंड आनंद होतो,' अशी पोस्ट टाकून लिंडाने आपलं यश साजरं केलं आहे.

  लिंडाच्या संपत्तीच्या पोर्टफओलिओमध्ये 180 पेक्षा जास्त युनिट्स

  लिंडाच्या संपत्तीच्या पोर्टफओलिओमध्ये (Portfolio) 180 पेक्षा जास्त युनिट्स आहेत. ते ती भाड्याने देते. गुंतवणूक करताना इन्व्हेस्टमेंट मार्केटबद्दल पूर्ण माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती माहिती तुम्ही घेतली नाही तर मात्र खूप मोठी चूक होऊ शकते, असं लिंडाचं म्हणणं आहे. चांगला पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर तुम्हाला मार्केट समजून घेणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुमचं स्वत:चं ज्ञान वाढवणं अत्यावश्यक आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यात अजिबात गुंतवणूक करू नका, असा सल्ला लिंडानं दिला आहे. सोशल मीडिया साईट्सवर जगभरातून माहिती, मनोरंजन असं सगळं प्रचंड प्रमाणात आदळत असतं. या सोशल मीडियाचा गैरवापर करणारेही अनेक जण आहेत; पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रगती करणारेही काही जण आहेत. लिंडा त्यापैकीच एक आहे. टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करून लिंडा थांबली नाही, तर तिने त्याचा योग्य वापरही केला आणि स्वत:ची प्रगती केली. तिनं जेव्हा बिझनेस सुरू केला, तेव्हा तिच्याकडे पाच लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेतीन कोटी रुपये एवढी संपत्ती होती. त्यानंतर तिनं अनेक ठिकाणी गुंतवणूक केली, नोकरीही केली. त्यानंतर आता केवळ सहा वर्षांतच तिच्याकडे 12 मिलियन युरो एवढी संपत्ती असल्याने ती अब्जाधीश झाली आहे. लिंडाप्रमाने तुम्ही देखील अगदी लहान वयातच धाडस करून व्यवसायाला सुरुवात केली आणि मेहनत केलीत, तर श्रीमंत होण्याचं तुमचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
  First published:

  पुढील बातम्या