Home /News /news /

पावसात भिजू नये म्हणून भाऊ- बहिण झाडाखाली थांबले, वीज कोसळली आणि...

पावसात भिजू नये म्हणून भाऊ- बहिण झाडाखाली थांबले, वीज कोसळली आणि...

पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे अशोक गावी आला होता.

    बीड, 12 जून : वीज पडून सख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्हयातील वडवणी तालुक्यातील मोरवड येथे घडली. बहिण भावाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. बीड जिल्ह्यातील मोरवड या गावात राहणारे विष्णू अशोक अंडील(17), पूजा अशोक अंडील(15) हे दोघे भाऊ- बहिण आपल्या आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेले होते. शेतात कापूस लावण्यासाठी काम सुरू होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता गावात पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून बहिण आणि भाऊ एका झाडाखाली थांबले होते. काही कळायच्या आत वीज झाडावर कोसळला. यात बहिण-भावाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर मुलगी पूजा गावातील विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती.पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे अशोक गावी आला होता. शुक्रवारी झालेल्या या दुर्दैर्वी घटनेत काळाने घाला घातला. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या