मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

OMG! जेव्हा Statue of Liberty वर कोसळली वीज; थरारक दृश्याचा व्हिडीओ व्हायरल

OMG! जेव्हा Statue of Liberty वर कोसळली वीज; थरारक दृश्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
न्यूयॉर्क, 23 जुलै : वीज जेव्हा आकाशात कडाडत असते तेव्हाच आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं त मग हृदयाचा ठोकाच चुकतो. अशात जर ही वीज स्टॅच्यु ऑफ लिबर्टीसारख्या (Statue of Liberty) विशाल पुतळ्यावर कोसळत असेल तर... सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये पावसाचे ढग भरून आले. आकाश अगदी काळंकुट्ट झालं. या काळ्याकुट्ट आकाशात विजांचा लखलखाट होत होता. अशात एक वीज कोसळून  थेट स्टॅच्यु ऑफ लिबर्टीजवळ (Statue of Liberty) कोसळली. स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या पायथ्यापर्यंत ही पोहोचल्याचं दिसतं आहे. बुधवारी दुपारचं हे दृश्य आहे. हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्याने आपल्या ट्वीटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 2020 वर्षात आणखी काय काय अशुभ घटना घडणार आहेत, याबाबत नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली आहे. हे वाचा - VIDEO: बिल्डिंगला आग लागली म्हणून चिमुरड्याने 40 फूटांवरून मारली उडी आणि... याआधी लंडनमध्ये (London) एका विमानावर (Plane) वीज कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, विमान हिथ्रो विमानतळावर (Heathrow Airport) लँड होण्याच्या तयारीत होतं आणि त्याचवेळी तीन बोल्ट वीज या विमानावर (Plane Hit By 3 Lightning Bolts) कोसळली. ही दृश्यं कॅमेऱ्यात टिपली गेली आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहाल, तर ढगातून तीन दिशेनं तीन वेगवेगळ्या विजा येतात आणि या विमानावर धडकतात. जणू या विजांनी सर्व बाजूंनी या विमानाला हेरलं आणि त्याच्यावर आक्रमणच केलं. विमानावर विजांनी हल्ला करताच ढगांचा इतका मोठा गडगडाट होतो की तो आवाज ऐकूनच धडकी भरते. हे वाचा - भयंकर! दुभंगली जमीन अन् अचानक निघाल्या आगीच्या ज्वाळा, पाहा थरारक VIDEO खरं तर ही दृश्यं टिपताना ती टिपणाऱ्याला प्रत्यक्षदर्शीलाही त्यावेळी वीज विमानावर कोसळल्याचं समजलं नाही. तो म्हणाला, "आकाशातील हे दृश्यं टिपण्यासाठी मी माझा कॅमेरा काढला आणि क्लिक केला. जेव्हा मी हा व्हिडिओ माझ्या कॅमेऱ्यात पुन्हा पाहिला, तेव्हा पाहतो तर का? विमानावर वीज कोसळली. ही वीज इतकी मोठी होती की कदाचित ती जमिनीवरही कोसळली"
First published:

Tags: Statue of liberty, Viral videos

पुढील बातम्या