मुंबई, 12 जून : राज्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेकांना आता चिंब भिजण्याचे आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी कुठेतरी फिरायला जाण्याचे वेध लागले असतील. खऱ्या अर्थाने पावसाला सुरूवात झाल्यानंतर जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या डोंगर माथ्यांवर, धबधबे, धरणं किंवा समुद्र किनारे अशा ठिकाणी फिरायला जाणार असाल, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यालाच हवी. कारण एखादी साधी चूक सुद्धा तुमच्यासाठी महागात पडू शकते.
1 - अलिकडे सर्वांनाच सेल्फीचा प्रचंड नाद लागला आहे. सेल्फीमुळे जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. कुठलाही विचार न करता एकापेक्षा एक सेल्फी घेण्याच्या नादात तरुण मंडळी वाहत चालली आहे. जर तुम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी डोंगरमाथ्यांवर, समुद्र किनाऱ्यांवर, धबधबे, तलाव अशा ठिकाणी जाणार असाल तर ही खबरदारी आधी घ्यावी.
सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO
2 - अनेकजण पावसाळ्यात फिरायला जाताना मद्यप्राशन करतात. अशा परिस्थितीत पोहण्याचा मोह आवरता न आलेल्या अनेकांचा जीव गेला आहे. शुद्ध हरपल्यामुळे आपल्याला पोहोतासुद्धा येत नाही याचंसुद्धा अनेकांना भान राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाताना ड्रिंक करणं धोक्याचं ठरू शकतं.
3 - तरुण मंडळींना नेहमीच काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. आपल्याकडे लक्ष वेधलं जावं म्हणून अनेक तरुण वेगात कोसळणाऱ्या धबधब्यात फिल्मी स्टाईलने उड्या घेतात. तर कुणी बाईकवर स्टंटबाजी करत मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लक्षात ठेवा असा उद्दामपणा तुमच्याच जीवावर बेतू शकतो.
फिरायला जाण्याआधी 'असं' प्लॅन करा बजेट; 20 टक्के कमी होईल तुमचा खर्च
4 - पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला जातात. पण पावसामुळे डोगरमाथे भिजल्याने सगळ्याच प्रकारच्या वाटा निसरड्या झालेल्या असतात. अनेक ठिकाणची जमीन भुसभुशीच झालेली असते. अशावेळेस ट्रेकिंगसाठी लागणालरं सगळं आवश्यक साहित्य तुमच्याजवळ असलं तरी त्याचा हवा तसा वापर न करता आल्यामुळे धोका संभवतो. त्यामुळे ट्रेकिंगला आवश्य जा पण स्वतःची काळजी घ्या.
5 - पावसाळ्यात नव्हे तर तुम्ही जेव्हा केव्हा फिरायला जाता तेव्हा सोबत मेडिकल किट ठेवा. त्याचा उपयोग होवो अथवा न होवो पण गरजेपुरती मेडिकल किट तुमच्याकेड असायलाच हवी. कारण ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाणार असाल ते ठिकाण शहरापासून दूर असू शकतं. अशावेळेस कुठलाही अनर्थ होऊ नेय म्हऊन ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी.