व्यक्तिमत्वाला ग्लॅमरस टच देण्यासाठी आला आहे 'हा' नवा ट्रेंड

विवाह स्थळासाठी प्रत्येक मुलाला आणि मुलीला चांगला फोटो काढायचा असतो

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 08:54 PM IST

व्यक्तिमत्वाला ग्लॅमरस टच देण्यासाठी आला आहे 'हा' नवा ट्रेंड

मुंबई, 14 जून : व्यक्तिमत्वाला ग्लॅमरस टच देण्यासाठी आता एक नवीन ट्रेंड आला आहे. स्थळ नोंदणीसाठी पूर्वीसारखा घरातच किंवा एखाद्या स्टुडिओत काढलेल्या फोटोऐवजी आता 'मॅट्रिमोनिअल फोटो' किंवा 'स्मॉल पोर्टफोलिओ' काढण्याचा ट्रेंड आला आहे.

मॅट्रिमोनिअल पोर्टफोलिओची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून, हे फोटो वेगवेगळ्या कपड्यांमध्ये, आवडीनुसार मेकअप करून, कधी स्टुडिओत तर कधी बाहेर जाऊन खुल्या प्रकाशात काढले जातात.

चिरतरुण दिसण्यासाठी मुलींनी घ्यावी 'ही' काळजी; जाणून घ्या 6 सोप्या टिप्स

मॅट्रिमोनी वेबसाइटची लोकप्रियता वाढल्यापासून अशा प्रकारचे पोर्टफोलिओ करून घेण्याचा ट्रेंड सुरू झाला. यात फेसबुकसारख्या साइटचाही वाटा जास्त आहे. कारण आजकाल तिथंही लग्नाच्या गाठी जुळू लागल्या आहेत. फेसबुकसारख्या साइट अशाप्रकारचे फोटो टाकण्यासाठी वेगवेगळे पर्यायही देताहेत. पूर्वी स्टुडिओत काढल्य़ा जाणाऱ्या उभ्या पोझमधल्या फोटोमध्ये चेहऱ्यावर टेन्शन दिसायचं. त्याऐवजी क्लोजअप, अनेक पोझमध्ये काढलेल्या, नैसर्गिक वाटणाऱ्या आउटडोअर लोकेशन्सवर काढल्या जाणाऱ्या फोटोंना जास्त मागणी आहे. स्थळ नोंदणीसाठी घरातच किंवा फारतर एखाद्या स्टुडिओत काढलेल्या फोटोपेक्षा 'मॅट्रिमोनिअल फोटो' किंवा 'स्मॉल पोर्टफोलिओ' काढण्याचा ट्रेंड आला आहे.

योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवायलाच हवं

Loading...

पोर्टफोलिओसाठी मुली इनडोअर शूट करणं पसंत करतात, तर मुलांना आउटडोअर जाऊन त्यांच्या कार किंवा बाइकसोबत किंवा तशा प्रकारचे कॅज्युअल फोटो काढून घ्यायचे असतात. स्थळासाठी प्रत्येकाला चांगला फोटो पाठवायचा असतो. पोर्टफोलिओ शूट केल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला ग्लॅमरस टच येतो, तसंच तुम्ही जास्त प्रेझेंटेबल दिसता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...