जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

स्वप्न, छंद आणि आपली आवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे यशस्वी जीवनाचं पहिलं सुत्रं आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 04:58 PM IST

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मुंबई, 18 जून - यशस्वी होण्यासाठी अनेक सुत्रं सांगितली जातात. पण त्यातील नेमकी कोणती सुत्रं आत्मसात करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 5 प्रमुख सुत्रं सांगणार आहोत. जी तुम्ही आचरणात आणली तर तुम्ही कुठल्य़ाही क्षेत्रात यशस्वी व्हाल.

1 - आपण आपल्या भोवती असे अनेक लोकं बघतो की जे लहानपणापासूनच एक वेगळं स्वप्न बघत असतात, पण प्रत्यक्षात मात्र ते त्या स्वप्नापेक्षा वेगळं कहीतरी करत असतात. आपलं स्वप्न, आपले छंद आणि आपली आवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे यशस्वी जीवनाचं पहिलं सुत्रं आहे.

विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास

2 - हे स्वप्न पूर्ण करत असताना तुमच्यात जेवढी शक्ती असेल आणि जेवढ्या तुमच्या क्षमता असतील तेवढ्या सगळ्या पणास लावण्याचा प्रयत्न करा. असा प्रयत्न करणारे लोकंच अशक्य ते शक्य करून दाखवतात.

3 - एखाद्या व्यक्तीचं कौतुक करण्याची गरज असेल तर तिथे अजिबात संकोच न करा त्या व्यक्तीची प्रशंसा करा. यामुळे एक पैसाही न खर्च करता माणस जोडली जातात. शब्दांनी जोडलेली माणसं ही आपल्या भावी आयुष्यात यश मिळविण्यसाठी उपयुक्त ठरतात.

Loading...

4 - आपल्या सभोवताली अनेक गरजवंत असतात. तुमच्याकडे पद असेल, अधिकार असतील तर तुम्ही त्यांची शक्य ती मदत करा. जर तुम्ही त्यांच्या मदतील धावून गेलात, तर ते सुद्धा तुम्हाला मदतीसाठी सदैव तत्पर राहतील.

प्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी

5 - कुणाला मदत मागितल्यानंतर अनेकदा नकार मिळतो, तर अनेकदा भरभरून मदत मिळते. जीवनातला प्रत्येक क्षण हा आनंदाचाच असेलच असं होत नाही. त्यामुळे दुःख, अपयश, नकार या तीन गोष्टी पचवायची तयारी ठेवा.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...