सावधान ! आंघोळ करताना करताय का 'या' चुका? तुमचं होतंय मोठं नुकसान

उन्हाळा तसंच पावसाळ्याच्या ऋतुत अनेकदा आपल्याला थकवा जाणवतो. शरीरात त्राणच उरत नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:16 PM IST

सावधान ! आंघोळ करताना करताय का 'या' चुका? तुमचं होतंय मोठं नुकसान

उन्हाळा तसंच पावसाळ्याच्या ऋतुत अनेकदा आपल्याला थकवा जाणवतो. शरीरात त्राणच उरत नाहीत. यामुळे अनेकदा आपल्यातला उत्साह देखील कमी होतो. या थकवा दूर करण्यासाठी बहुतांश जण ऑफिस किंवा बाहेरून घरी आल्यानंतर आंघोळ करतात. काही जण तर शॉवरमधून अंगावर पाणी घेत तास-तासभर बाथरुममध्ये राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमच्या शरीराचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  तास-तासभर शॉवरखाली आंघोळ केल्यानं तुमचा थकवा दूर होत आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर या केवळ तुमचा गैरसमज आहे. उलट तुमचं नुकसानच अधिक होत आहे.

आंघोळ करताना या चुका करणं टाळा :

1. बऱ्याच जणांना गरम पाण्यानं आंघोळ करणं पसंत असतं. असं म्हटलं जातं की गरम पाण्यांमुळे शरीरामध्ये योग्य रितीनं रक्ताभिसरण होण्यास मदत होतं. ज्यामुळे थकवादेखील कमी होतो. पण या नादात अनेक जण फार उशिरापर्यंत गरम पाण्यानं आंघोळ करतात. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक हळूहळू नाहीशी होऊ लागते. त्वचा कोरडी होते.

(वाचा :इंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन)

2. प्रचंड धूळ, ऊन आणि गरमीमुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या निर्माण होते. यामुळे बऱ्याचदा असह्य अशी खाजदेखीस सुटते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण डोक्यावरील त्वचा(scalp )नखांनी रगडतात. यामुळे डोक्यावरील त्वचेला नुकसान पोहोचते आणि केस गळती सुरू होते. केस धुण्यासाठी हर्बर शॅम्पूचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे केसांना हलक्या हातांनी मसाज करावा. थोड्या वेळानंतर पाण्यानं केस धुवावेत आणि कंडिशनरदेखील करावं.

Loading...

(वाचा :रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचं आहे ? मग आपल्या पार्टनरसाठी हे नक्की करा)

3. कित्येक जण साबणाच्या सुगंधावरून त्याचा वापर करतात. पण सुगंधावरून साबणाची निवड न करता शरीराच्या त्वचेसाठी कोमल असेल अशा साबणाची निवड करावी.

(वाचा :पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका सर्वाधिक, खा 'ही' फळं)

4. अनेकदा उशिरापर्यंत आंघोळ केल्यानं त्वचेचा पोत बिघडण्याची शक्यता असते. त्वचा रुक्ष होऊ नये यासाठी आंघोळीनंतर शरीर पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेलचा वापर करावा. त्यानंतर मॉईश्चरायझरदेखील आठवणीनं लावावं.

SPECIAL REPORT : 'हवा के साथ..' हेमा मालिनींनी फक्त हवेत फिरवला झाडू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...