ऑफिसमध्ये तुम्ही सहकाऱ्यांसोबत जेवता का? जाणून घ्या हे मोठे फायदे

Office : ऑफिसमध्ये जर तुम्ही सहकाऱ्यांसोबत जेवण करत नसाल, तर तुमचं फारच मोठं नुकसान होत आहे. हे नक्की वाचा.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 08:11 PM IST

ऑफिसमध्ये तुम्ही सहकाऱ्यांसोबत जेवता का? जाणून घ्या हे मोठे फायदे

बहुतांश जण घरापेक्षाही अधिक वेळ ऑफिसमध्येच असतात. या लोकांसाठी ऑफिस म्हणजे दुसरं घरच झालेलं असतं, असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही.

बहुतांश जण घरापेक्षाही अधिक वेळ ऑफिसमध्येच असतात. या लोकांसाठी ऑफिस म्हणजे दुसरं घरच झालेलं असतं, असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही.

बऱ्याच जणांचा 9 तासांच्या शिफ्टपेक्षाही अधिक वेळ ऑफिसमध्येच जातो आणि याचा त्यांना कंटाळादेखील येत नाही.

बऱ्याच जणांचा 9 तासांच्या शिफ्टपेक्षाही अधिक वेळ ऑफिसमध्येच जातो आणि याचा त्यांना कंटाळादेखील येत नाही.

यामागील कारण म्हणजे बॉस, आपले सहकारी आणि तेथील आनंददायी वातावरण. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची आपल्यासोबतची वागणूक चांगली असेल तर ही सर्व माणसं आपल्यासाठी एखाद्या कुटुंबीयांप्रमाणेच वाटू लागतात.

यामागील कारण म्हणजे बॉस, आपले सहकारी आणि तेथील आनंददायी वातावरण. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची आपल्यासोबतची वागणूक चांगली असेल तर ही सर्व माणसं आपल्याला एखाद्या कुटुंबीयांप्रमाणेच वाटू लागतात, याचा अनुभव तुम्हालाही कधीतरी आला असेलच.

आपल्या मूळ घरापासून, आपल्या माणसांपासून, घरातलं जेवण सोडून दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी याहून आणखी चांगली गोष्ट काय असू शकते.

आपल्या मूळ घरापासून, आपल्या माणसांपासून, आईनं केलेलं चविष्ठ जेवण सोडून दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी याहून आणखी चांगली गोष्ट काय असू शकते.

आपण बऱ्याचदा सहकर्मचारी आणि बॉसकडे आपल्या मनातील गोष्टी, समस्या, सुखदुःख वाटत असतो. यावर त्यांच्याकडून आपल्याला योग्य ते सल्लेदेखील दिले जातात.

आपण बऱ्याचदा सहकर्मचारी आणि बॉसकडे आपल्या मनातील गोष्टी, समस्या, सुखदुःख वाटत असतो. यावर त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी योग्य ते सल्लेदेखील दिले जातात.

यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे. ऑफिसमध्ये आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत जेवण केल्यास त्यांच्यासोबतच आपलं नातं आणखी घट्ट होतं शिवाय सकारात्मकरित्या काम होण्यासही मदत होते.

यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे. ऑफिसमध्ये आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत जेवण केल्यास त्यांच्यासोबतच आपलं नातं आणखी घट्ट होतं शिवाय सकारात्मकरित्या काम होण्यासही मदत होते. याचा जितका फायदा आपल्याला होतो, तितकाच फायदा कंपनीलादेखील होतो, अशी माहिती समोर आली आहे.

कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक केविन यांनी फायरहाउसमध्ये काम करणाऱ्या लोकांवर संशोधन केलं होतं.

कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक केविन यांनी फायरहाउसमध्ये काम करणाऱ्या लोकांवर संशोधन केलं.

या संशोधनादरम्यान त्यांना आढळून आलं की येथील सर्व कर्मचारी एकत्र मिळून दुपारचं जेवण स्वतः शिजवतात आणि जेवतात. यामुळे या सर्वांमध्ये एकमेकांबद्दलची आपुलकी दिसून आली.

या संशोधनादरम्यान त्यांना आढळून आलं की येथील सर्व कर्मचारी एकत्र मिळून दुपारचं जेवण स्वतः शिजवतात आणि जेवतात. यामुळे या सर्वांमध्ये एकमेकांबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आली.

केविन यांनी या संशोधनाच्या आधारे सांगितलं की, फायरमॅन एकत्रच जेवण करतात. त्याचं ऑफिसमधलं कार्यदेखील सुरळीत चाललं होतं.

केविन यांनी या संशोधनाच्या आधारे सांगितलं की, फायरमॅन एकत्रच जेवण करतात. त्याचं ऑफिसमधलं कार्यदेखील सुरळीत चाललं होतं.

यावरून त्यांनी असा निष्कर्ष लावला की, सहकाऱ्यांना एकमेकांप्रती असलेल्या आदरामुळे ऑफिसच्या उत्पादनावर याचा चांगला फायदा होत होता.

यावरून त्यांनी असा निष्कर्ष लावला की, सहकाऱ्यांना एकमेकांप्रती असलेल्या आदरामुळे ऑफिसच्या उत्पादनावर तसंच उत्पन्नावरही याचा चांगला फायदा होत होता.

शिवाय, त्यांच्यात काम करताना वेगळाच उत्साह देखील अनुभवायला मिळाला.

शिवाय, त्यांच्यात काम करताना वेगळाच उत्साह देखील अनुभवायला मिळाला.

केविन यांनी असंही सांगितलं की, तुम्ही दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांसोबत जेवण करत असाल तर तुमच्या ओळखीही वाढण्यास मदत होते.

केविन यांनी असंही सांगितलं की, तुम्ही दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांसोबत जेवण करत असाल तर तुमच्या ओळखीही वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या सहकाऱ्यांसोबत जेवत नसाल तर त्यांच्यासोबत जेवण करा. याचा फायदा तुम्हालाच होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close