घनदाट केस हवे आहेत? मग आठवड्यातून इतक्या वेळा करा शॅम्पू

आपल्याला काळेशार, चमकदार आणि घनदाट केस असावेत, अशी ईच्छा केवळ महिलाच नाही तर पुरुषांचीही असते.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 07:33 PM IST

घनदाट केस हवे आहेत? मग आठवड्यातून इतक्या वेळा करा शॅम्पू

आपल्याला काळेशार, चमकदार आणि घनदाट केस असावेत, अशी ईच्छा केवळ महिलाच नाही तर पुरुषांचीही असते. यासाठी बहुतांश जण निरनिराळ्या प्रकारचे उपायदेखील करतात. कधी हेअरपॅक, कधी घरगुती उपाय तर कधी केसांची सुंदरता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट्सही केल्या जातात. काही जण तर नियमित शॅम्पूनं केस धुतात. पण जर तुम्हालाही रोज शॅम्पूनं केस धुण्याची सवय असेल तर तुमच्या केसांचं सौंदर्य धोक्यात आहे. हो...हे खरं आहे. कारण नियमित शॅम्पूनं केस धुतल्यानं नैसर्गिक चकाकी कमी होऊन केस कोरडे होतात. यामुळे तुमच्या केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

केस घनदाट आणि मजबूत राहावेत, असं वाट असेल तर जाणून घेऊया आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणं तुमच्या केसांसाठी योग्य ठरेल...

1. जर तुमचे केस जाड, नैसर्गिकरित्या तेलकट नसतील, कुरळे तसंच कोरडे असतील तर तुम्ही रोज शॅम्पूनं केस धुणं टाळा. तुम्ही रोज शॅम्पूचा वापर करत असाल तर यामुळे केस अतिशय कोरडे होण्याची शक्यता आहे.

(वाचा :PUBG चा भारतातला Digital Partner ठरला)

2. दोन किंवा तीन दिवसांच्या अंतरानं केसांना शॅम्पू करावं. जर तुमचे केस अतिशय तेलकट, घामाने दुर्गंधी येत असेल तर नक्कीच केस धुणं गरजेचं आहे. घामानं केसात दुर्गंधी राहिल्यास कोंड्याची समस्या वाढू शकते.

Loading...

3. पार्लरमध्ये जाऊन तुम्हाला केसांसाठी कोणती ट्रिटमेंट घ्यायची असेल तर त्यापूर्वी आठवणीनं केस नक्की धुतले गेले पाहिजेत. तसंच केसांना योग्य पद्धतीनं कंडिशनिंगदेखील करावं. हेअर ट्रिटमेंटनंतर आठवड्यापर्यंत केस धुऊ नये. याबाबत तुम्ही हेअर स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा.

(वाचा :वजन कमी करण्यासोबत बडीशेप खाण्याचे आहेत अनेक 'हे' 5 फायदे)

4.केसांची स्वच्छता राखणंही गरजेचं आहे. ऊन आणि धुळीपासूनदेखील केसांचा बचाव केला पाहिजे. जेणेकरून वातावरणातील धुळीमुळे तुमच्या केसांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

(पाहा :VIDEO : तुम्हाला खूप राग आला आहे? मग जा या 'भडास कॅफे'मध्ये !)

5. शक्य असल्यास घराबाहेर पडताना केसांना स्कार्फनं झाकावं. यामुळे ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होणार नाही.

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hair style
First Published: Jul 10, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...