Home /News /news /

COVID-19 विरुद्ध लढण्यासाठी Lifebuoyने घालून दिला कित्ता, सहभागी झाले नामवंत

COVID-19 विरुद्ध लढण्यासाठी Lifebuoyने घालून दिला कित्ता, सहभागी झाले नामवंत

प्रत्येकजण आपापल्या परीने लोकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

  कोरोना व्हायरस (COVID-19) या एका अकल्पित महामारीचा झालेला उद्रेक हा या जगात आतापर्यंत घडलेल्या अत्यंत मोठ्या आरोग्यविषयक आपत्तींपैकी एक आहे. याचे आपल्या जीवनशैलीवर अनपेक्षित परिणाम होऊन जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. आपण संपूर्ण दिवस घरातच कंठत आहोत. दरम्यान विविध माध्यमांतून आपल्याला कसे सुरक्षित राहता येईल याविषयी विविध प्रकारे माहिती सतत मिळत आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी शासन राष्ट्रीय स्तरावर पायबंद घालण्याचा प्रयत्न करत आहेच पण, काही अग्रगण्य कंपन्याही एकमेकांपासून ठराविक अंतर ठेवून राहणाऱ्या देशातील नागरिकांना रिझवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच COVID-19 चा सामना कसा करावा याबाबत माहिती देत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने लोकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच धरतीवर Lifebuoy या अग्रगण्य कंपनीनेही हातांच्या स्वच्छतेची पद्धत व त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच त्यांना उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही साबणाचा वापर करण्यास उद्युक्त करण्यासाठी एक देशव्यापी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रसिद्ध कंपनीने हात धुण्याचे महत्त्व लोकांपर्यंत अभिनव पद्धतीने पोहचवण्याकरिता लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री काजोल तसेच युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या भारतीय रॅप आर्टिस्ट बादशाह, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्याशी हात मिळवला आहे. बॉलीवूड अभिनेत्री काजोल यांना आपण नेहमी Lifebuoy ची जाहिरात करताना पाहिले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे, या संकटाच्या काळात साबण कोणताही वापरला तरी चालेल पण  हात धुणे महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष देण्यास लोकांना उद्युक्त केले आहे. हात धुण्याचे महत्त्व सांगताना बॉलीवूड तारका व लाईफबॉयच्या जाहिरातकर्त्या काजोल म्हणतात, “मी नेहमी जरी Lifebuoy ची जाहिरात करत असले तरीही, या आपत्काळात Lifebuoy व मी, दोघांनाही याची जाणीव आहे की, तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही साबण वापरता हे महत्त्वाचे आहे.
  @badshahWash karo hands like a boss, Challenge karne waalo ko mera applause ##LifebuoyKarona @Lifebuoy_India♬ Lifebuoy Karona - Lifebuoy
  बादशाह यांनी लाईफबॉयच्या ‘तंदुरुस्ती की रक्षा’ या लोकप्रिय जिंगलचे एक रॅप व्हर्जन तयार करून एक हँड-वॉशिंग चॅलेंज सुरू केले आहे, ज्यामधून हात धुण्याच्या सध्याच्या काळातील महत्त्वाकडे लक्ष वेधत ते   ही क्रिया अभिनव पद्धतीने लोकांसमोर आणत आहेत. या अनोख्या पद्धतीबद्दल बोलताना बादशाह म्हणतात, “मी हे चॅलेंज स्वीकारणाऱ्या सर्वांना विनंती करतो की, ही क्रिया किती सोपी आणि प्रभावी आहे हे समजून घ्या. मला आशा आहे की, आपण लवकरच या बिकट परिस्थितीवर मात करू.” Lifebuoy ने Paytm तसेच YouWeCan या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या संस्थेबरोबर तिहेरी भागीदारी केली आहे ज्यामुळे लोक Paytm मार्फत दानही करू शकतात. या राशीचा उपयोग समाजातील अखंड सेवारत असलेल्या वर्गाला आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केला जात आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग म्हणतात, “ या काळामध्ये भारतातील नागरिकांनी यथाशक्ती सहकार्य करून COVID-19 शी लढण्यासाठी शासनाला पाठबळ दिले पाहिजे. येथील प्रत्येकाने एकत्रितपणे शपथ घेऊया आणि देशभरातील या रोगाच्या प्रसाराला आळा घालुया. या रोगाला बळी पडण्याची दाट शक्यता असलेल्या वर्गाला आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता Lifebuoy India व Paytm बरोबर भागीदारी करून मी माझे कर्तव्य करतो आहे, मला आशा वाटते की, तुम्हीही तुमचे कर्तव्य योग्य तऱ्हेने पार पाडाल.”
  इतकेच नाही तर, Lifebuoy ने बृहन्मुंबई महानगरपालिकेशी( BMC) हातमिळवणी केली आहे, जी शासकीय व उद्योग संस्थेच्या सहकार्याच्या बाबतीतली पहिली वहिली भागीदारी आहे. ते संयुक्तपणे या महामारीबद्दल जनजागृती करत आहेत तसेच या कठीण प्रसंगी अग्रस्थानी राहून रात्रंदिवस कार्यरत असलेल्या लोकांना आरोग्य सुविधादेखील पुरवत आहेत. एक देश म्हणून आपण अत्यंत कठीण काळाचा सामना करत आहोत, आणि या महामारीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याकरिता Lifebuoy सारख्या अग्रगण्य कंपन्या त्यांची विश्वासार्हता उपयोगात आणत आहेत ही एक सुखद बाब आहे. आता आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की, या संकट काळाचा शेवट करण्यासाठी आपण सर्वांनी यथाशक्ती योगदान दिले पाहिजे. ही भागीदारांनी मिळून केलेली पोस्ट आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  पुढील बातम्या