VIDEO फॅशन शो दरम्यान सँडलमध्ये अडकला गाउन; रँपवरच पडली असती ही प्रेग्नंट अभिनेत्री...

VIDEO फॅशन शो दरम्यान सँडलमध्ये अडकला गाउन; रँपवरच पडली असती ही प्रेग्नंट अभिनेत्री...

एका प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रँप वॉक करताना बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन पायघोळ कपड्यांमध्ये पाय अडकून रँपवरच पडणार होती. लिसा प्रेग्नंट आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : एका प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रँप वॉक करताना बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन पायघोळ कपड्यांमध्ये पाय अडकून रँपवरच पडणार होती. लिसा प्रेग्नंट आहे. वेळीच सावरल्याने रँपवरच्या या अपघातातून ती थोडक्यात बचावली. मुंबईत सुरू असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक 2019 या सोहळ्यात लिसा हेडन फॅशन डिझायनर अमित अग्रवालच्या फॅशन शोची शो स्टॉपर होती.

प्रेग्नंट असतानाही अमित अग्रवालसाठी लिसा हेडन मॉडेलिंग करत होती. तिचे बेबी बंपही स्पष्ट दिसत आहेत. ती रँपवर उतरल्यावर प्रेक्षकांनी तिचं जोरदार स्वागत केलं. पण पहिल्या काही सेकंदातच लिसा अडखळली. तिचा पायघोळ ड्रेस तिच्याच पायात अडकला. हाय हिल्स घातल्यामुळे तिला सावरायला जरा वेळ लागला. हा व्हिडिओ पंजाब केसरीने शेअर केला आहे.

प्रेग्नंट असतानाही रँप वॉक करणारी ही काही पहिली मॉडेल नाही. करिना कपूर खानने लॅक्मे फॅशन वीकमध्येच हा ट्रेंड सुरू केला. तिने लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये शो स्टॉपर म्हणून वॉक केला, त्यावेळी ती सहा महिन्याची गरोदर होती.

मृत म्हणून कचऱ्यात फेकलेली 'ती' आज बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसून खेळतेय KBC

नेहा धुपियासुद्धा गरोदर असताना तिने रँपवॉक केलं होतं. याशिवाय अनेक मॉडेल्सनी आपले बेबी बम्प आणि स्ट्रेच मार्क दाखवत रँप वॉक केलं होतं. मॉडेलिंग संदर्भातल्या काही जुन्या समजुतींना छेद देण्याचं काम या अभिनेत्री आणि मॉडेल्सनी केलं होतं.

बॉलिवूड पदार्पणाआधी हॉटेलमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 23, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading