गणेश मंडपात पत्ते खेळू द्या, चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंची अजब मागणी

गणेश मंडपात पत्ते खेळू द्या, चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंची अजब मागणी

गणपतीच्या मंडपात जुगार खेळू द्यावा अशी धक्कादायक मागणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलीये.

  • Share this:

 सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद  

23 आॅगस्ट : गणेश उत्सवात रात्री पत्ते खेळावेत की नाही यावरूण आता औरंगाबादमध्ये चर्चा सुरू झालीये. सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांनी गणेश मंडळात पत्ते खेळण्याची परवानगीचं समर्थन केलंय.

यावर कडी म्हणजे पत्त्याच्या डावातून आलेले पैसे गणेश मंडळांना द्यावेत अशी पुस्तीही त्यांनी जोडलीये. भाजप नेतेही यात कसे मागं राहणार?, भाजपच्या आमदार अतुल सावेंनी तर गणेश मंडपात खेळल्या जाणाऱ्या पत्त्यांना जुगार म्हणूच नये असंही सांगितलं.

कोणी कायदा मोडत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय.

पत्ते खेळणं हा जुगारच आहे. पण खैरे आणि सावे यांच्या मागणीवरून मात्र पोलीस विरूद्ध राजकारणी हा वाद होण्याची शक्यता आहे.

First published: August 24, 2017, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading