• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • युवासेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच रचला कट?

युवासेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच रचला कट?

युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनिष काळजे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनिष काळजे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या युवासेना जिल्हा प्रमुखावर (Yuvasena district chief) जीवघेणा हल्ला (lethal attack) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  सोलापूर, 15 ऑगस्ट: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या युवासेना जिल्हा प्रमुखावर (Yuvasena district chief) जीवघेणा हल्ला (lethal attack) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री 14 ते 15 जणांच्या टोळक्यानं युवासेनेच्या जिल्हा प्रमुखावर आणि त्यांच्या वाहन चालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात युवासेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे (Manish Kalaje) गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच केला असल्याचा आरोपी केला जात आहे. त्यामुळे सोलापूरातील राजकीय वातावरण तापत आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूरातील देगाव रोड येथील मरीआई चौक परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनिष काळजे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या शेतातून घरी परतत होते. दरम्यान देगाव रोड येथील मरीआई चौकात दबा धरून बसलेल्या 14 ते 15 जणांच्या टोळक्यानं काळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हेही वाचा-जालन्यात पुजाऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO ही केला शूट संतप्त जमावानं काळजे यांच्यासह त्यांच्या ड्रायव्हरवर देखील हल्ला चढवला होता. या भयानक हल्ल्यात काळजे  गंभीररित्या जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री उशीरा त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. युवासेनेच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला झाल्याची माहिती समोर येताच रात्री उशीरा देगाव रोड परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनीच हा हल्ला केला असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत माहिती दिली नाही. हेही वाचा-सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्राला दगडानं ठेचलं, मृतदेहाचे तुकडे केले अन्... दुसऱ्या एका घटनेत,  काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दोन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांनी राजकीय वादातून हा हल्ला केला होता. आरोपींनी संबंधित दोघांवर टेम्पो घालून हत्या केली होती. तसेच हा अपघात असल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी पोलिसांनी बेळगावातून चालकासह पाचही जणांना अटक केली आहे. संबंधित आरोपी हत्या केल्यानंतर कर्नाटकात फरार झाले होते.
  Published by:News18 Desk
  First published: