नाशिकवर चेन्नईसारखं संकट, चांगला पाऊस होऊपर्यंत घशाला कोरड

नाशिकवर चेन्नईसारखं संकट, चांगला पाऊस होऊपर्यंत घशाला कोरड

एकीकडे जिल्ह्यातील धरणांमध्ये कमी झालेला पाण्याचा साठा, त्यात मान्सूनने केलेला उशीर यामुळे नाशिकमध्ये पाण्याची परिस्थिती भीषण आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 22 जून : नाशिक जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ अनुभवायला मिळाला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली असून, गंगापूर धरणामध्ये अवघा 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चेन्नईमध्येदेखील भीषण पाणीटंचाई आहे. चेन्नईमध्ये पाण्याचे सगळे स्त्रोत सुकल्यामुळे लोकांवर मोठं पाणीसंकट ओढावलं आहे. अशीच परिस्थिती आता नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौरांनी अधिकाऱ्यांसह शनिवारी गंगापूर धरणाचा दौरा केला आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता शहरात एक वेळ पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला.

एकीकडे जिल्ह्यातील धरणांमध्ये कमी झालेला पाण्याचा साठा, त्यात मान्सूनने केलेला उशीर यामुळे नाशिकमध्ये पाण्याची परिस्थिती भीषण आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौर, विरोधी पक्षनेते आणि सर्व अधिकाऱ्यांनी शनिवारी नाशिकच्या गंगापूर धरणाचा दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना देत एक वेळ पाणी कपातीचा निर्णय महापौरांनी जाहीर केला आहे.

गंगापूर धरणामध्ये सध्या 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाण्याची क्षमता वाढावी यासाठी काम सुरू असून, पाणीकपातीवरून विरोधक कोणतंही राजकारण करणार नाहीत अशी ग्वाही पालिकेतील विरोधीपक्ष नेत्यांनी दिली आहे.

शहरात एक वेळ पाणी कपात जाहीर झाल्यानंतर नाशिककरांचं पाण्याच संकट वाढल आहे. मान्सून उशिरा दाखल झाला तरी नाशिककरांना 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे हीच काय ती दिलासादायक बाब म्हणावी लागेल. पण या सगळ्या चांगला पाऊस होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा कुठे नाशिकऱ्यांच्या घशाची कोरड भागेल असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO: 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'; कार्यकर्त्यांची भावना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या