मुंबई, 03 डिसेंबर : आतापर्यंत बिबट्यानं माकडाची पळवून पळवून शिकर केल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण म्हणतात ना एकीचं बळ खूप मोठं असतं. बिबट्या टोळीवर हल्ला करण्यात मात्र अपयशी ठरतो. असाच काहीसा प्रकार तलावावर पाणी प्यायला आलेल्या बिबट्यासोबत घडला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्यावर माकटांची टोळी हल्ला करते. बिबट्या या माकडांना हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला मात्र माकडं त्याच्या कोणत्याही आक्रमक भूमिकेला बळी पडली नाहीत तर त्यांनी बिबट्यावर हल्ला केला आणि पळताभुई थोडी केली. बिबट्याला नाईलाजास्तव पाणी न पिताच तिथून पळ काढावा लागला.
एकीचं बळ काय असतं हे दाखवणारा हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 15 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून भन्नाट कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी झाडावर चढून बिबट्या माकडाची शिकार करत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. तर काही दिवसांपूर्वी माकडाने वाघाची कळ काढत त्याचे झाडाच्या फांदीवर बसून कान ओढल्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. मात्र हा व्हिडीओ सर्वात वेगळा आहे. एकीचं बळ आणि एकत्र येऊन संकटाचा सामना केला तर नक्कीच त्यातून आपली सुटका होते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतं.