जुन्नरमध्ये बिबट्याचा 5 महिन्याच्या चिमुरडीवर हल्ला, ५०० मीटर नेलं फरफटत

जुन्नरमध्ये बिबट्याचा 5 महिन्याच्या चिमुरडीवर हल्ला, ५०० मीटर नेलं फरफटत

कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि त्यांना मुलगी घरी नसल्याचे जाणवले.

  • Share this:

जुन्नर, २४ जानेवारी २०१९- जुन्नर तालुक्यातील येडगाव इथं खानेवाडी परिसरात एक पाच महिन्यांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालीये. लक्ष्मण कुल्हाळ यांची ५ महिन्यांची नात आई वडिलांच्यामध्ये झोपली होती. परंतु रात्री ३ च्या सुमारास बिबट्याने तिला पाचशे मीटरवर फरपटत नेलं. कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि त्यांना मुलगी घरी नसल्याचे जाणवले. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे कळताच, मुलीची आई बिबट्यामागे पळत गेली. मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला. सकाळी उजाडल्यावर मुलगी मृत अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी वनविभागाला घडलेली घटना कळवली. वनविभाग अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला. आता जुन्नरमधल्या नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील वरवंड गावात रात्रीच्यावेळी अस्वल शिरल्याचा व्हिडीओ किराणा दुकानसमोरील cctv मध्ये कैद झाला. १२ दिवसांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये अस्वल दुकानासमोरील एका डब्ब्यात काहीतरी शोधताना दिसत आहे. यामुळे वरवंड गावात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असून हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. कदाचित जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची आणि अन्नची सुविधा नसावी म्हणून हे अस्वल पाण्यासह अन्नाच्या शोधात वरवंड गावात शिरले असावे, असा अंदाज गावकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Special Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...

First published: January 24, 2019, 7:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading