नवी दिल्ली, 16 मे : लिनोवो कंपनीने मंगळवारी फ्लोरिडा येथे फोल्डेबल स्क्रीन असलेला लॅपटॉप सादर केला. जगातला हा पहिला फोल्डेबल डिस्प्ले असलेला लॅपटॉप असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या लॅपटॉपचं नाव अद्याप समोर आलं नसलं तरी, तो ThinkPad X1 या श्रेणीतला असणार आहे. कॉम्प्युटर विश्वात हा लॅपटॉप क्रांतीकारक बदल घडवणार असल्याचा दावा चीनच्या लेनोवो कंपनीने केला आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोनसारखीच पॉलीमर स्क्रीन आणि ओएलईडी डिस्प्ले या लॅपटॉपमध्ये आहे. विंडोजवर चालणाऱ्या या लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर राहणार असून, कोणत्याही बाजूने तो वापरता येईल. 2020 मध्ये तो बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
Motorolaच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत
सॅमसंगचा गैलेक्सी फोल्ड हा फोल्डेबल स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच झाला होता. मात्र, फोल्ड केल्यानंतर त्याची स्क्रीन चिटकत असल्याने, कंपनीने 31 मे पर्यंत दिड लाख रुपये किमतीच्या या स्मार्टफोनची विक्री थाबवली आहे. तसंच त्यासाठीच्या सगळ्या प्री-ऑर्डरसुद्धा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.
लिनोवोच्या फोल्डबेल थिंकपॅडमध्ये पूर्वीसारखा एक कीबोर्ड राहणार आहे, जो लॅपटॉपच्या एका साईडला अर्ध्यापेक्षाही कमी जागेत असेल. तसंच एक टचस्क्रीन कीबोर्ड डिस्प्लेवर राहणार आहे. याद्वारे तुम्ही लॅपटॉपचासुद्धा एखाद्या टॅबलेट प्रमाणे वापर करू शकाल. याशिवाय ब्लूटूथच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला कीबोर्ड पापरता येईल. फोल्ड केल्यानंतर याची 9.6 इचाची स्क्रीन होणारा हा लॅपटॉप 2020 मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. यात दोन चांगल्या क्षमतेच्या बॅटरीज राहणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.