S M L

राष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे

लातूर- बीड विधानपरिषद निवडणूकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोडपाणी केल्याचा आरोप केलाय. कराडांच्या या आरोपामुळं राष्ट्रवादीची गोची झाली आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 7, 2018 05:03 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे

उस्मानाबाद,ता.07 मे: लातूर- बीड विधानपरिषद निवडणूकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं एकच खळबळ उडालीय. शिवाय उमेदवारी मागे घेताना रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोडपाणी करण्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावर असल्याचं स्पष्ट होतं. मात्र रमेश कराड यांनी केलेले गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे फेटाळून लावलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलून उस्मानाबाद - लातूर- बीड विधानपरिषदेची हट्टाने मागून घेतली. त्यानंतर भाजपमधून आलेल्या रमेश कराड यांना उमेदवारीही बहाल केली. पण रमेश कराड यांनी अचानक माघार घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्ष उमेदवार जगदाळे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवलीय.

रमेश कराड यांच्या भूमिकेनं विधान परिषद निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालंय. विधान परिषद निवडणूकीत पैसेवाले उमेदवार आणि निवडणूकीत होणारा घोडेबाजार ही दबक्या आवजातली चर्चा आहे. पण त्यात खुद्द उमेदवारानेच तोडपाणी केल्याच्या आरोपानं राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र मोठी गोची झालीय.

गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले रमेश कराड यांचं भाजप सोडून राष्ट्रवादीला जवळ करणं हा पंकजा मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जात होता. आत कराडांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे पंकजा मुंडे असल्याची चर्चा असून ही खेळी खेळून त्यांनी धनंजय मुंडेंना शह दिल्याचं बोललं जातंय.

 

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 04:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close