Home /News /news /

भाजपला लवकरच मोठा झटका, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिले संकेत

भाजपला लवकरच मोठा झटका, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिले संकेत

विशेष म्हणजे, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

  मुंबई, 10 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लवकरच धक्का देण्याबाबत संकेत दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपने मेगाभरती काढत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना ग्रीन कॉरिडॉर तयार करून दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. पण, राज्यात सत्तेचा डाव असा पलटला की, भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आली. शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, माजी मंत्र्याला पुन्हा खास जबाबदारी! त्यामुळे 'जे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहे ते पदरी काहीच न पडल्यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन नाराज झालेल्या नेत्यांची यादी मोठी असून ते  आता राष्ट्रवादीमध्ये पुन्हा येण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत 'गेल्या घरी सुखी राहा' असं सांगत दार बंद करून घेतले होते. पण, राज्यात आक्रमक झालेल्या भाजपला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीला ही संधी चालून आली आहे. त्यामुळे, 'जे राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेले आहे, त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय अद्याप घेतला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि याची माहिती सार्वजनिक केली जाईल, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहे. त्याचबरोबर, 'गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहे. पण, ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली. विशेष म्हणजे, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार दिवाळीनंतर पाडण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाचे मनसुबे आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भाजपकडून  तयारी सुरू आहे, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

  मोठी कारवाई, तब्बल 1000 कोटींचे ड्रग्स जप्त,माफियाची पद्धत पाहून पोलीस हैराण

  एवढंच नाहीतर, जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे चर्चा केली त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन तर नाही ना? असा प्रश्न दिल्लीतील राजकीय गल्लीमध्ये उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच, आता भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीनेही त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवण्याचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी  भेट घेतली होती. मलिक यांनी दिलेल्या संकेतानुसार, साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या