नेत्यांनी थकवले शेतकऱ्यांचे उसाचे पैसे, भाजपकडे 1505 कोटी तर अजित पवारांकडे 245 कोटी थकीत!

नेत्यांनी थकवले शेतकऱ्यांचे उसाचे पैसे, भाजपकडे 1505 कोटी तर अजित पवारांकडे 245 कोटी थकीत!

भाजप नेत्यांपाठोपाठ सर्वाधिक 1502 कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तालयाला वेढा दिल्यानंतर राज्यातल्या थकीत साखर कारखान्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. या कारवाईवेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या कारखान्यांकडे सर्वाधिक 1505 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडे तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. त्यापाठोपाठ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंकडे 64 कोटी रुपये आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे 18 कोटींची रक्कम थकीत आहे.

भाजप नेत्यांपाठोपाठ सर्वाधिक 1502 कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे. यामध्ये सर्वाधिक 245 कोटी रुपयांची थकीत रक्कम राष्ट्रवादीचे नेचे अजित पवार यांच्याकडे आहे. त्यापाठोपाठ 159 कोटी रुपयांची ऊस बिलं जयंत पाटलांनी थकवली आहेत.

तर काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्यांनी 1341 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांनी सर्वाधिक 141 कोटी रुपये थकवले आहेत. तर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या कारखान्यानं 68 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी 22 कोटी रुपये थकवले आहेत.

कोणत्या पक्षाने किती थकवले?

भाजप - 1505 कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस - 1502 कोटी

काँग्रेस - 1341 कोटी

शिवसेना - 285 कोटी

भाजप नेत्यांच्या 73 कारखान्यांकडे 1505 कोटी रुपये

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या 53 कारखान्यांकडे 1502 कोटी रुपये

काँग्रेसच्या नेत्यांच्या 44  कारखान्यांकडे 1341 कोटी रुपये

शिवसेने नेत्यांच्या 12 कारखान्यांकडे 285 कोटी कोटी रुपये

कोणत्या नेत्याकडे किती बाकी?

अजित पवारांकडे सर्वाधिक 245 कोटी रुपये

जयंत पाटलांकडे 159 कोटीं रु.

सुभाष देशमुखांकडे 104  कोटी रु.

पंकजा मुंडेंकडे 64 कोटी रु.

हर्षवर्धन पाटलांकडे 141 कोटी रु.

राधाकृष्ण विखे पाटलांकडे 68 कोटी रु.

अशोक चव्हाणांकडे 22 कोटी रु.

प्रकाश आवाडेंकडे 179 कोटी रु.

========================================================

First published: January 30, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading