अशोक चव्हाणांच्या भिवंडीच्या सभेत एलसीडी स्क्रीन कोसळली, एक जण जखमी

अशोक चव्हाणांच्या भिवंडीच्या सभेत एलसीडी स्क्रीन कोसळली, एक जण जखमी

हवा सुटल्यामुळे मैदानातील एलसीडी स्क्रीन कोसळली

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 25 जानेवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भिवंडीतील सभेत दुर्घटना घडली आहे. सभा संपताच मैदानातील एक एलसीडी स्क्रीनसह सेट कोसळला आहे. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. हवा सुटल्यामुळे मैदानातील एलसीडी स्क्रीन कोसळली आहे. जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. आज भिवंडीमध्ये अशोक चव्हाणांची सभा आयोजित करण्यात आली होती.

====================

First published: January 25, 2019, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading