राजा तू चुकतो आहेस, त्यात सुधारणा हवी- संमेलनाध्यक्ष

राजा तू चुकतो आहेस, त्यात सुधारणा हवी- संमेलनाध्यक्ष

''राजा तु कुठेतरी चुकतो आहेस, त्यात सुधारणा झाली पाहिजे, '' अशा शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारचे कान टोचले.

  • Share this:

17 फेब्रुवारी, बडोदा : ''राजा तू कुठेतरी चुकतो आहेस, त्यात सुधारणा झाली पाहिजे, '' अशा शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारचे कान टोचले. बडोद्यात भरलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सरकारला कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना केल्यात. सरकार कुठेतरी चुकत आहे. त्यात त्यांनी सुधारणा केली पाहिजे, असं देशमुख यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी सयाजीराव महाराजांची आवर्जून आठवण काढली. प्रत्येक धर्माने आपल्यात कालानुरूप बदल करावा ही सयाजीराव महाराजांनी सांगितली गोष्ट फार महत्वाची आहे, हेच सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असंही लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलंय.

या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थीत होते. यावेळी संमेलनाच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि बडोदा संस्थानच्या राजमाता शुभांगीराजे यांच्या हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2018 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...