अकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना!

अकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना!

एम.जे.अकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज तयार आहे. तर प्रत्यक्ष कोर्टात 6 निष्णात वकिल त्यांची बाजू मांडणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.15 ऑक्टोबर : #MeToo मोहिमेत लैंगिक गैरव्यवहाराचे आरोप झालेला परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज तयार आहे. तर प्रत्यक्ष कोर्टात 6 निष्णात वकिल त्यांची बाजू मांडणार आहेत. अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्या विरूद्ध अकबर यांनी सोमवारी दिल्लीतल्या पातियाळा कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हा खटला लढवण्याची जबाबदारी त्यांनी लॉ फर्म 'करनजावाला अँड कंपनी' ला दिलीय.

या कंपनीच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितलं की कंपनीत 100 वकिल वकिल आहेत. जे वकिल ही केस लढवतात त्यावर तेच वकिल स्वाक्षरी करतात. अकबर याच्या प्रकरणात निष्णात वकिलांचा एक गट काम करतोय. आणि काही वकिल प्रत्यक्ष कोर्टात बाजू मांडणार आहेत.

हे वकिल लढवणार खटला

लॉ फर्म च्या नुसार संदीप कपूर, वीर संधू, निहारिका करनजावाला, अपूर्व पांडेय, मयंक दत्ता आणि गुड़िपति जी. कश्यप पातियाळा कोर्टत परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा खटला लढवतील.

भारतीय दंड संहितेच्या कलम 499, 500 नुसार या खटल्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. आपल्याविरूद्धचे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा खुलासा अकबर यांनी केला होता. #MeToo च्या मोहिमेत 15 महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

हे आरोप होत असताना अकबर हे नायजेरीयाच्या दौऱ्यावर होते. रविवारी भारतात परत आल्यानंतर त्यांनी एक पत्रक काढून खुलासा केला आणि सर्व आरोप फेटाळून लावले. अकबर हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वृत्तपत्रांचं संपादकपदही त्यांनी भुषवलं होतं.

अकबर हे संपादक असल्याच्या काळात या सर्व घटना घडल्याचा दावा महिला पत्रकारांनी केला होता. अकबर भारतात परत आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असंही म्हटलं जात होतं. मात्र त्यांनी राजीनामा न देता खटला दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

#MeToo या मोहिमेत आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. चौफेर दबाव वाढत असतानाही सरकारने अकबर यांची पाठराखण केली आहे. आपल्या विरूद्धचे सर्व आरोप हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि प्रतिमा मलिन करण्यासाठीच आहेत असही अकबर यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.

अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.

 

गौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका

First published: October 15, 2018, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading