LIVE : लातूर,परभणी आणि चंद्रपूर पालिकेच्या निकालाचे संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर

लातुरामध्ये देशमुखांची तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2017 08:12 PM IST

LIVE : लातूर,परभणी आणि चंद्रपूर पालिकेच्या निकालाचे संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर

20 एप्रिल : राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणूकांनंतर आज चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे या तीन जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 3 जगांपैकी एका जागेवर भाजपची, एका जागेवर कॉंग्रेसची तर एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.

तिन्ही महापालिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांचं भवितव्याचा आज निकाल लागणार आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 43 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 57 टक्के, तर लातूर महानगरपालिकेसाठी 42 टक्के मतदान झालं. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती.

Loading...

या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लातूर महापालिकेचा गड काँग्रेस राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर चंद्रपूर महापालिकेची सत्ता मिळ्वण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरांची प्रतिष्ठा पणाला लागली.

 

काय स्थिती आहे 3 पालिकांची ?

 • देवेंद्र सरकारनं मुंबईसह पालिकांमध्ये बाजी मारल्यानंतर होणारी पहिली पालिका निवडणूक
 • लातुरात 70, चंद्रपुरात 66 तर परभणीत 65 जागांसाठी लढत होतेय
 • सध्या लातुरात काँग्रेस, चंद्रपुरात भाजपचा तर परभणीला राष्ट्रवादीचा महापौर
 • तीनही ठिकाणी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीविरूद्ध भाजप अशीच लढतच होण्याची चिन्हं
 • लातुरात अमित देशमुख, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठापणाला, परभणीत मोठा नेता नाही
 • तीनही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान तर भाजपसमोर विजयी घौडदौड

 

लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70

 • राष्ट्रवादी काँग्रेस- 13
 • काँग्रेस- 49
 • शिवसेना- 06
 • रिपाइं- 02

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

 • राष्ट्रवादी काँग्रेस- 30
 • काँग्रेस- 23
 • शिवसेना- 8
 • भाजप- 2
 • अपक्ष- 2

चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

 • काँग्रेस- 26
 • भाजप- 18
 • शिवसेना- 5
 • राष्ट्रवादी- 4
 • मनसे- 1
 • बीएसपी-1
 • अपक्ष- 10

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...