LIVE NOW

LIVE: उद्या संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू - मुख्यमंत्री

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटस्ट अपडेट

Lokmat.news18.com | April 13, 2021, 9:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 13, 2021
auto-refresh

Highlights

9:16 pm (IST)

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी
लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंध - मुख्यमंत्री
'उद्या रात्री 8 पासून राज्यात कडक निर्बंध लागू'
राज्यात उद्यापासून 144 कलम लागू - मुख्यमंत्री
15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी - मुख्यमंत्री
'अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई'
'सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू'
'बस, लोकल, हवाई वाहतूक सुरू राहणार'
सर्व आस्थापना बंद राहणार - उद्धव ठाकरे
'अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवा बंद'
पावसाळीपूर्व कामं सुरू राहणार - मुख्यमंत्री
'सेबी, पेट्रोलियम, आयटी कार्गो सुरू राहतील'
अनावश्यक येणं-जाणं बंद राहणार - उद्धव ठाकरे
'अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद'
'पेट्रोल पंप सुरू राहणार, अनावश्यक वाहतूक बंद'
'हॉटेल्स बंद, होम डिलिव्हरीची परवानगी'
'हॉटेल कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक'
'सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेसाठी'
'केंद्रानं नैसर्गिक आपत्तीप्रमाणे लाभ द्यावा'
'अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मदत'
'दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य'
प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ मोफत - मुख्यमंत्री
प्रति व्यक्ती 3 किलो गहू मोफत - मुख्यमंत्री
एक महिना मदत देणार - उद्धव ठाकरे
'शिवभोजन थाळी पुढचा 1 महिना मोफत'
35 लाख लाभार्थ्यांना थेट मदत - मुख्यमंत्री
1 हजाराची अग्रीम मदत देणार - मुख्यमंत्री
'नोंदणीकृत घरगुती कामगारांना मदत'
'अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपयांची मदत'
'परवानाधारक रिक्षाचालकांसाठी 1500 रु. मदत'
'आदिवासी कुटुंबांना 2 हजारांची मदत'
'35 लाख दिव्यांगांना 1 हजार आगाऊ रक्कम'
'आरोग्यासाठी 5 हजार 400 कोटींची तरतूद'
'कोविडसाठी 3 हजार 300 कोटींची तरतूद'
नोंदणीकृत बांधकाम मजुरांना निधी - मुख्यमंत्री
'5 हजार 400 कोटी निधी वाटप करणार'
घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही - मुख्यमंत्री
निर्बंधांमागे प्राण वाचवणं हाच उद्देश - मुख्यमंत्री
साखळी तोडण्यासाठीच निर्बंध - मुख्यमंत्री
'30 एप्रिलपर्यंत राज्यात निर्बंध लागू राहणार'

9:16 pm (IST)

वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक - मुख्यमंत्री
'मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी'
आरोग्य यंत्रणांना त्याचं श्रेय - मुख्यमंत्री
'डिसेंबरपर्यंत कोविड स्थिती नियंत्रणात'
पुन्हा स्थिती भीतिदायक बनलीय - मुख्यमंत्री
'वाढवलेल्या सुविधा अपुऱ्या पडतायत'
रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय - मुख्यमंत्री
कोरोना चाचण्यांची संख्या वाढलीय - मुख्यमंत्री
बेडची संख्या वाढवण्यात आलीय - मु्ख्यमंत्री
'10वी, 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या'
'विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ नको'
'प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न'
सर्वांशी संवाद साधण्यात आला - मुख्यमंत्री
पण किती काळ चर्चा करणार? - उद्धव ठाकरे
'100 टक्के ऑक्सिजन वापर आरोग्यासाठी'
'तरीही ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडतोय'
'पारदर्शकपणे सर्व गोष्टींना तोंड देतोय'
रुग्णसंख्या आपण लपवत नाही - उद्धव ठाकरे
'रेमडेसिवीरच्या मागणीतही वाढ झालीय'
इतर राज्यांतून ऑक्सिजन आणतोय - मुख्यमंत्री
ऑक्सिजनचं उत्पादन वाढवलं - मुख्यमंत्री
वेळ पडल्यास लष्कराची मदत घेऊ - मुख्यमंत्री
'जीएसटी परताव्यासाठी पंतप्रधानांना विनंती'
'जीएसटी परताव्यासाठी मुदतवाढ द्यावी'
कोरोना हीसुद्धा नैसर्गिक आपत्ती - मुख्यमंत्री
लसीकरण वाढवावं लागेल - मुख्यमंत्री
आताची लाट प्रचंड मोठी - उद्धव ठाकरे
आपण लाट थोपवून दाखवली - मुख्यमंत्री
कोरोनाची रुग्णवाढ भयावह - मुख्यमंत्री
आरोग्य सुविधा तोकडी पडतेय - मुख्यमंत्री
'औषधांचाही तुटवडा निर्माण झालाय'
राज्यात आरोग्य सुविधा वाढवतोय - मुख्यमंत्री
'आरोग्य सुविधांबरोबर डॉक्टर वाढवण्यावर भर'
ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही - मुख्यमंत्री
'आपण एकसाथ लढलो तरच साथीवर विजय मिळवू'

8:21 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 7898 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 11,263 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू

7:50 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 5313 नवे रुग्ण
पुण्यात दिवसभरात 4573 कोरोनामुक्त
पुण्यात दिवसभरात 73 रुग्णांचा मृत्यू

6:59 pm (IST)

नागपूरच्या कन्हान-कांदरी परिसरातील घटना
रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यानं 4 रुग्णांचा मृत्यू
घटनेनंतर नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
आठवड्याआधीच कोविड रुग्णालय केलं होतं सुरू
जि.प.च्या आरोग्य विभागावर होती जबाबदारी
रुग्णालयातील 29 भरती रुग्णांना इतरत्र हलवलं

6:31 pm (IST)

नाशिक - पालिकेच्या सर्व रुग्णालयात रेमडेसिवीरचा शून्य टक्के साठा, मायलान कंपनीसोबत पालिकेनं केला करार, 20 हजार इंजेक्शन खरेदीचा तातडीनं केला करार, पालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसैन रुग्णालयातील रुग्णांना दिले जाणार रेमडेसिवीर, 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीनंतर आयुक्तांचा तातडीनं खुलासा, तर खासगी रुग्णालयांचाही एल्गार, सर्व खासगी अधिग्रहित कोविड रुग्णालयांचं प्रशासनाला साकडं, 8 दिवसांत रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमेबचा पुरवठा करा, नाहीतर रुग्णांवर उपचार करणं अशक्य

5:49 pm (IST)

कोल्हापूर - राधानगरी, गगनबावडा रोडवर गव्यांच्या कळपाचं दर्शन, गवे रस्ता ओलांडताना कॅमेऱ्यामध्ये कैद, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे राधानगरी अभयारण्य

5:46 pm (IST)

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा झाला खंडित, भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले, हायस्कूलच्या इमारतीचं मोठं नुकसान, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

5:37 pm (IST)

नाशिक - पालिका रुग्णालयाचा अजब कारभार
बिटको रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
दाखल रुग्णाला रेमडेसिवीर नसल्याचं कारण
मोठी खरेदी केल्याचा पालिका आयुक्तांचा दावा
स्टॉक असताना बाहेरून आणा याचं कारण काय?
रुग्णाला बाहेरून आणण्यासाठी दिलंय प्रिस्क्रिप्शन

5:22 pm (IST)

नागपुरात दिवसभरात 6826 नवीन रुग्ण
नागपुरात दिवसभरात 3518 कोरोनामुक्त
नागपुरात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू

Load More
कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटस्ट अपडेट