• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त संख्येचा विक्रम, दिवसभरात 5374 रुग्णांना डिस्चार्ज

LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त संख्येचा विक्रम, दिवसभरात 5374 रुग्णांना डिस्चार्ज

राज्य तसेच देशभरातील कोरोना आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 22, 2021, 21:42 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  'मविआ हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हटलं तर चालेल?'
  वि.प.विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल
  राऊतांनी विरोधक हे ब्लॅक फंगस असल्याची केली होती टीका
  वि.प.विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचं टिकेला चोख प्रत्युतर
  'भान न ठेवता वक्तव्य करणं संजय राऊतांनी बंद करावं'
  'राऊतांच्या प्रत्येक वक्तव्यात भाजप द्वेष, तिरस्कार ओतप्रेत'
  टोकाचा पक्षीय द्वेष लोकशाहीस घातक; प्रवीण दरेकरांचं मत

  20:58 (IST)

  संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
  'राज्यातील विरोधक हे एक प्रकारचे ब्लॅक फंगसच'
  दुर्लक्ष करण्याचा राऊतांचा शिवसैनिकांना सल्ला
  'मुख्यमंत्री चांगलं काम करतायत, त्यांची प्रेरणा घ्या'
  'एकीकडे WHO, पंतप्रधानांकडून राज्याचं कौतुक'
  मात्र विरोधकांकडून राजकारण सुरू - संजय राऊत
  'दुसऱ्या लाटेत कोरोनाशी लढा, जनतेची मदत करा'
  खासदार संजय राऊतांचा शिवसैनिकांना सल्ला 

  20:7 (IST)

  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  रुग्णसंख्या दुपटीचा वेग 326 दिवसांवर
  मुंबईत दिवसभरात 1299 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 1827 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 52 रुग्णांचा मृत्यू 

  19:38 (IST)

  रायगड - समुद्र किनाऱ्यांवर 2 दिवसांत 5 मृतदेह
  अलिबाग तालुक्यात 4 तर मुरुडला एक मृतदेह
  मुरुड, नवगाव, आवास, दिघोडीत सापडले मृतदेह
  चक्रीवादळात बेपत्ता बोटीतील मृतदेह असल्याची शक्यता 

  18:18 (IST)

  परभणी शहरातील ऑक्सिजन प्लांटमध्ये बिघाड
  जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमधील प्लांट
  पाईप फुटल्यानं ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम
  आपत्कालीन यंत्रणा वेळीच सुरू, अनर्थ टळला
  जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट 

  17:52 (IST)

  'कोरोना उपचारांमुळे म्युकरमायकोसिस होत नाही'
  'नव्या म्युटंटमुळे शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं'
  टास्क फोर्स सदस्य डॉ.तात्याराव लहानेंची माहिती 

  16:33 (IST)

  राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार
  राहुल गांधी 23 किंवा 25 मे रोजी हिंगोलीत
  राजीव सातव यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट 

  16:29 (IST)

  बारावी परीक्षेच्या संदर्भात उद्या महत्वाची बैठक
  व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेवरही चर्चा
  राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
  शिक्षणमंत्र्यांचं राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पत्र
  राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक 

  16:29 (IST)

  'देशातील 7 राज्यांमध्ये कोरोना वाढला'
  '10 राज्यांमध्ये 78 टक्के कोरोना रुग्ण'
  'कोरोनातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं'
  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती 

  12:22 (IST)

  'बार्जच्या दुर्घटनेचं राजकारण होतंय'
  'खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचं काम'
  आशिष शेलार यांचा 'मविआ'वर आरोप
  'राज्य सरकार, पोलिसांच्या भूमिकेवर संशय'
  'अॅफकॉन'ला वाचवण्याचं काम - शेलार
  'राज्यपाल कायद्याच्या कक्षेत काम करतायत'
  राज्यपालांवर कालावधीचं बंधन नाही - शेलार
  राज्यपाल-सरकार वादावर भाजपची भूमिका

  राज्य तसेच देशभरातील कोरोना आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स