Home /News /news /

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घट, चांदीही स्वस्त; काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घट, चांदीही स्वस्त; काय आहेत नवे दर?

मागील वर्षात म्हणजे 2021 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 3.6 टक्क्यांची घसरण झाली आहे, जी 2015 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घट आहे.

    मुंबई, 7 जानेवारी : दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 301 रुपयांनी घसरून 46,415 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 46,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 402 रुपयांनी घसरून 59,044 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीचे दर 60,446 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,789 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 22.08 डॉलर प्रति औंस राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटलं की, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर शुक्रवारी स्पॉट सोन्याच्या किमती 1,789 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरल्या. त्यामुळे येथील सोन्याच्या भावात घसरण झाली. अमेरिकेतील रोखे उत्पन्न वाढल्यामुळे सोन्याच्या किमती दबावाखाली होत्या. Multibagger Stock : 'या' 24 रुपयांच्या स्टॉकची कमाल; अवघ्या आठवडाभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल 2015 नंतर इतकी मोठी घसरण 2021 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 3.6 टक्क्यांची घसरण झाली आहे, जी 2015 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घट आहे. महागाईचा सामना करण्यासाठी केंद्रीय बँका कोरोना महामारीच्या काळात घेतलेल्या मदतीच्या उपाययोजना हळूहळू मागे घेत आहेत, त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे.
    घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कर्ज घेण्याची नवी पद्धत, शेअर्स तारण ठेवून घेता येईल Loan; वाचा काय करावं लागेल? कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या