वाह! 7 वर्षाच्या चिमुकलीनं कोरोनाशी युद्ध जिंकलं, अवघ्या 7 दिवसांत रिपोर्ट निगेटिव्ह

वाह! 7 वर्षाच्या चिमुकलीनं कोरोनाशी युद्ध जिंकलं, अवघ्या 7 दिवसांत रिपोर्ट निगेटिव्ह

गेल्या सात दिवसांपासून ही चिमुकली कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होती. अखेर तिचे आता रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 13 एप्रिल : कोरोनामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पण यामध्ये एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. औरंगाबादमध्ये ती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.

गेल्या सात दिवसांपासून ही चिमुकली कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होती. अखेर तिचे आता रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. तिच्या या धैर्यामुळे आणि जिद्दीमुळे संपूर्ण रुग्णालयात तिचं कौतूक होत आहे. ही चिमुकली धूत रुग्णालयात उपचार घेत होती. अवघ्या सात दिवसांमध्ये ती कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीतून बरी झाली. खरंतर या रुग्णालयात आणखी एक रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक 59 वर्षीय महिलाही याच रुग्णालयातून कोरोनामुक्त झाली. त्यामुळे या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व स्टाफचंदेखील कौतूक आहे. दरम्यान, कल्याणमध्येही एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली होती. कोरोनाला हरवून जेव्हा हे बाळ परत आपल्या घरी आलं तेव्हा शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत आसपासच्या सोयायटीमधील नागरिकांनी त्या बाळाचं स्वागत केलं.

महाराष्ट्रात धोका वाढला, रुग्णांची संख्या 2064 वर

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात एकूण संख्याही तब्बल 2064 वर पोहोचली आहे.

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 82 नवे रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. एकटा मुंबईत 82 पैकी 59 रुग्ण आढळले आहे. यात धारावी, कोळीवाडा परिसराचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्येही 12 रुग्ण आढळले आहे. मालेगावमध्ये गेल्या 48 तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: April 13, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या