मुंबई, 28 नोव्हेंबर: 2020 या वर्षातील चौथं आणि शेवटचं चंद्रग्रहण (LUNAR ECLIPSE) 30 नोव्हेंबरला दिसणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासह आतापर्यंत 4 ग्रहणं लागली आहेत. यावर्षी 30 नोव्हेंबरला चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण पेन्युंब्रल प्रकारचं आहे यात काही तासांसाठी चंद्राच्या छटा एकदम गडद काळ्या दिसतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकून जातो. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकते, परंतु सूर्यग्रहण नव्हे. या ग्रहणावेळी सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचू शकत नसल्याने याला ग्रहण म्हटले जाते.
फर्स्ट पोस्टने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. ग्रहणाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. पूर्ण चंद्रग्रहण, अर्ध चंद्रग्रहण आणि प्युनंब्रल चंद्रग्रहण. येणारं ग्रहण हे प्युनंब्रल चंद्रग्रहण असून यामध्ये सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडताना तो पृथ्वीमुळे थोड्या प्रमाणात रोखला जातो त्यावेळी हे ग्रहण होतं. पृथ्वीची बाह्य सावली, ज्याला प्युनंब्रा म्हणतात त्यामुळे चंद्रग्रहण होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी लागणारं हे चंद्रग्रहण आशियातील काही देशांमध्ये तसंच अमेरिकेच्या काही भागांतही दिसेल. याशिवाय हे ग्रहण ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशातही दिसेल असं टाइम अँड डेट या वेबसाइटनी म्हटलं आहे. ग्रहण काळात चंद्राचा एकूण 82 टक्के भाग हा गडद होईल असा अंदाज खगोलशास्रज्ञांनी म्हटलं आहे.
भारतात कधी आणि कसे पाहू शकता चंद्रग्रहण?
2020 चे प्रथम चंद्रग्रहण 10 जानेवारी रोजी दिसलं होतं. अमेरिका, मध्य कॅनडा आणि दक्षिण अमेरिका वगळता जगातील बर्याच भागांमध्ये चंद्रग्रहण दिसलं होतं. 2020 मधील चार प्युनंब्रल चंद्रग्रहणांपैकी ते एक होतं.
भारतात कधी दिसणार ?
30 नोव्हेंबरला हे चंद्रग्रहण दुपारी 1.04 वाजता सुरु होईल आणि 3.13 वाजता ह्याचा मध्यकाल होऊन हे ग्रहण संध्याकाळी 5.23 वाजता समाप्त होईल. 4 तास 21 मिनिटे हे चंद्रग्रहण राहणार आहे. चंद्र काही काळ क्षितिजाच्या खाली जाईल, त्यामुळे ग्रहणातील फक्त काही भाग भारतात दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Space