• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मुंबई-गोवा महामार्गावर कोसळली दरड, संपूर्ण वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर कोसळली दरड, संपूर्ण वाहतूक ठप्प

भर रस्त्याच्यामध्ये मोठे मातीचे ढिगारे पडले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य घटनास्थळी दाखल झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 • Share this:
  रायगड, 09 जुलै : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणदेवी गाव हद्दीत ही दरड कोसळली असून संपूर्ण महामार्ग त्याच्यामुळे ठप्प झाला. भर रस्त्याच्यामध्ये मोठे मातीचे ढिगारे पडले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य घटनास्थळी दाखल झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. भर रस्त्याच्या मध्ये मातीचे ढिगारे असल्यामुळे महामार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. पोलादपुर पोलीस आणि एल अँड टीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सुमारे 200 मिटर लांब रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. संपूर्ण माती बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे. या दरडीची माती सुमारे 200 मिटर रस्त्या असल्याने दरड काढण्याचे काम रात्रभरात होणार नाही.  त्यामुळे आज रात्रभर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील वाहतुक बंद राहणार आहे.
  Published by:Renuka Dhaybar
  First published: