19 मे : : देवभूमी उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयागजवळ मोठं भुस्खलन झालंय. या दुर्घटनेत 15 हजार यात्रेकरू अडकल्याचे वृत्त आहे. या अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये राज्यातील औरंगाबाद येथील 35 भाविकांचा समावेश आहे. या भूस्खलनामुळे बद्रीनाथला जाणारा मार्ग ठप्प झालाय.
विष्णुप्रयागजवळ चामोली जिल्ह्यातल्या जोशीमठजवळ मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालंय. औरंगाबादमधून काही भाविक यात अडकले आहे. औरंगाबादचे हेरंब ट्रॅव्हल्सचे मालक मंगेश कपोते हे या भाविकांसोबत आहे. एकूण 35 भाविक आहेत. हे सर्व भाविक सुखरूप असून सध्या ते गोविंदधाम इथं मुक्कामी आहे. साधारणपणे 25 ते 30 हजार भाविक या भूस्खलनात अडकले असावे अशी माहिती कपोते यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली.
आज दुपारी 3.30 च्या सुमारास हे भूस्खलन झाल्याचं कळतंय. हायवेवरील ५० मीटरचा भाग पूर्णपणे बंद झालाय. बीआरओकडून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवस हा मार्ग ठप्प राहणार असल्याचं कळतंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा